चर्चा राज्यपाल कोश्यारी यांच्या पदमुक्तीची, विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

| Updated on: Nov 28, 2022 | 9:37 PM

राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून पदमुक्त होण्याची इच्छा किंवा राजीनामा या चर्चेत तथ्य नाही. असं सांगताना राजभवनाकडून खंडन करण्यात आलं.

चर्चा राज्यपाल कोश्यारी यांच्या पदमुक्तीची, विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?
भगतसिंह कोश्यारी
Follow us on

मुंबई – राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची चर्चा आहे. त्यावर संजय राऊत म्हणतात, राज्यपाल कोश्यारी हे सुटकेचा मार्ग शोधत असतील. भाजपनं त्यांना ऐवढे दिवस ठेवलचं कसं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, इच्छा इथं व्यक्त करून काही अर्थ नाही. राज्यपाल यांनी राष्ट्रपती यांना राजीनामा द्यावा. संपला विषय. काही अवघड नाही. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की, राष्ट्रपती भवनात राजीनामा पाठवून द्यावा. नि आपल्या गावी निघून जा. छगन भुजबळ यांनी सांगितलं की, राज्यपाल यांना जायचंय आहे. पण, केंद्रानंच त्यांना थांबविलं असावं. ज्यांनी ठेवलं आहे त्यांना असं वाटतं की, ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात.

राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून पदमुक्त होण्याची इच्छा किंवा राजीनामा या चर्चेत तथ्य नाही. असं सांगताना राजभवनाकडून खंडन करण्यात आलं. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, असं कुणी अधिकृत बोललं का. कुणीतही असं सांगावं की, मी राज्यपाल यांना भेटलो. त्यांनी वेळ दिली होती. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं. मला आता राहायचं नाही.

राज्यपाल या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतात हे योग्य नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. एक व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली. यात कार्यकर्त्यानं विचारलेल्या प्रश्नाला राज्यपाल कोश्यारी म्हणतात. तुम्हाला दुःख झालं असेल तर ती गोष्ट मी मानतो. प्रेझेंट करण्यात थोडी चूक झाली. आम्हाला महाराष्ट्राला तोडायचं नाही. आम्हीचं निघून जाऊ, असं या व्हिडीओ क्लीपमध्ये राज्यपाल बोलताना दिसतात.

महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांनी सूचक विधान केलं होतं. केदारनाथ येथून मी आलो. पाच हजार लोकं एकावेळी वाहून गेले. राज्यात आल्यानंतर पाऊस जास्त होत असेल तर नुकसान होते. असं नुकसान होत असेल तर मी निघून जाईल, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते.

३ डिसेंबरला किल्ले राजगड येथे आक्रोश व्यक्त करणार असल्याचं उदयनराजे भोसले यांनी जाहीर केलं.