मिलिंद सोमणच्या जबाबाने दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट, धक्कादायक खुलासा समोर

| Updated on: Mar 28, 2025 | 7:33 PM

दिशा सालियान प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी अभिनेता मिलिंद सोमण यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला आहे.

मिलिंद सोमणच्या जबाबाने दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट, धक्कादायक खुलासा समोर
Disha Salian
Image Credit source: Tv9 Network
Follow us on

बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. मालवणी पोलिसांनी यापूर्वीच दिशा सालियान मृत्यूप्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. या क्लोजर रिपोर्टमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे आहेत. पोलिसांनी दोन सेलिब्रेटींचा जबाब नोंदवला होता.

दिशा पटाणीमुळे सालियन टेन्शनमध्ये

दिशा सालियान काम करत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीच्या जाहिरातीशी थेट सबंधित असलेल्या मिलिंद सोमण आणि दिशा पटणीचा यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता. दिशा पटणी आणि मिलिंद सोमण यांनी कॉर्नरस्टोन या कंपनीशी दोन वेगवेगळ्या जाहिरातींसाठी करार केला होता. या दोन्ही सेलिब्रेटींशी संवाद ठेवण्याची आणि बोलणी करण्याची जबाबदारी दिशा सालियनवर होती. करारात नमूद नसलेल्या गोष्टी करायला सांगितल्या जात असताना दिशा पटानीने नकार दिल्याने दिशा सालियन टेन्शनमध्ये होती.

हे सुद्धा वाचा

मिलिंद सोमण काय म्हणाले?

मिलिंद सोमणने एका मोबाईल कंपनीची जाहिरात या कंपनीसोबत केली होती. मात्र करार संपल्यानंतर त्यांनी एक ट्विट केल होत. या ट्विटमुळे कंपनी अडचणीत आली होती. मिलिंद सोमणने #banchinaproducts हे ट्विट केल होते. यावर त्या मोबाईल कंपनीने आक्षेप घेतला होता. करार संपुष्ठात आल्याने मी केलेले ट्वीट डिलीट करणार नाही अशी भूमिका सोमण यांनी घेतली होती. कॉर्नरस्टोन कंपनीशी सबंधित या दोन बाबींमुळे दिशा तणावात होती हेही एक कारण.

पोलिसानी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशाने आत्महत्या केल्याचे नमूद करत ती कोणत्या कारणास्तव तणावात होती हे स्पष्ट केले होते. वडिलांच्या अफेअरबद्दलची माहिती, कंपनीच्या डील करण्यात अपयशी आणि काही आर्थिक बाबींच्या त्रासामुळे दिशा त्रस्त होती. म्हणून दिशाने आत्महत्या केल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांचा निष्कर्ष आहे.