मुंबईः सध्या राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू असून तो आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस अगदी 15 जुलैपर्यंत मुंबईसह ठाणे, मुंबई (Mumbai), रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार (Kolhapur District Heavy Rain) पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुण्यातील काही भागातही पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही पुढील तीन दिवस काही भागात मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे. तर 14 व 15 तारखेला मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस प्रचंड पाऊस कोसळणार असल्याचे सांगण्यात आले असून मुंबईमध्ये मात्र शुक्रवारी पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पडणार असला तरी सांगली आणि सोलापूरमध्ये मात्र हलक्या स्वरूपाच पाऊस होणार आहे. 15 जुलैपर्यंत अगदी सांगली सोलापूरमध्ये हलक्या स्वरूपाचाच पाऊस होणार आहे.
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस पावसाची परिस्थिती सारखीच असणार आहे, मंगळवार आणि बुधवारी जोरदार पावसाची शक्यता असली तरी पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होणार आहे. तर परभणीमध्ये दोन दिवस जोरदार पाऊस होणार असून पुढील चार दिवस हलक्या सरीचा पाऊस होणार बरसणार आहे.
बीड जिल्ह्यात या आठवड्यात हलकाच पाऊस होणार असून हिंगोली जिल्ह्यामध्ये मात्र उद्या जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असून पुढील तीन दिवस हलक्याच पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर अकोला, भंडारा, बुलाढाणा जिल्ह्यात मात्र एक दोन ठिकाणी मेघगर्जनेसह एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता असून 14, 15 तारखेला मात्र हलक्या सरीचा पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मात्र पावासाचे प्रमाण कमी असणार आहे, या जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.