Diwali 2023 : कल्याणच्या बाजारात गुजरातच्या पणत्या, ‘या’ कारणामुळे कुंभार करत आहेत आयात

| Updated on: Nov 08, 2023 | 9:46 AM

पणत्या, मडकी यासारख्या मातीच्या वस्तु काळ्या मातीपासून बनवून त्या भट्टीत भाजून तयार कराव्या लगतात. मात्र विकासाच्या गराड्यात भट्टया गायब होत होत नामशेष झाल्या आहेत. भट्टया पेटविण्यासाठी जागा राहिलेली नसून, मोकळ्या जागेवर भट्टी पेटवल्यास त्यातून निघणाऱ्या धूरांमुळे प्रदूषण होत असल्याने या भट्टया बंद कराव्या लागल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Diwali 2023 : कल्याणच्या बाजारात गुजरातच्या पणत्या, या कारणामुळे कुंभार करत आहेत आयात
गुजरात मधून आणलेले दिवे
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

मुंबई : दिव्यांचा सण दिवाळी (Diwali) हा अगदी दोनच दिवसांवर येऊन ठेपला आहे. धनत्रयोदशीपासून घरोघरी पणत्यांमध्ये दिवे लावले जातात. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पणत्यांची दूकाने थाटलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवाळी या दिव्याच्या सणाला पणत्याना मोठी मागणी असली तरी पारंपरिक पणत्या, टिवल्या बनविणायसाठी लागणाऱ्या कल्याणतील भट्टया काळाच्या पडद्याआड गडप झाल्याने विक्रेत्यानाच नव्हे तर कुंभारांना देखील या पणत्या गुजरात मधून विकत घ्याव्या लागत आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या पणत्या या थेट गुजरात मधून आणल्या जात असून, या पणत्या 3 रुपये प्रती नग या दराने खरेदी कराव्या लागत आहेत. मात्र 5 रुपयांनासुद्धा या पणत्या कोणी ग्राहक घेण्यास धजावत नसल्याने विक्रेत्यांसह कुंभारवाडातील कुंभाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

विकासाच्या गराड्यात भट्या गायब

पणत्या, मडकी यासारख्या मातीच्या वस्तु काळ्या मातीपासून बनवून त्या भट्टीत भाजून तयार कराव्या लगतात. मात्र विकासाच्या गराड्यात भट्टया गायब होत होत नामशेष झाल्या आहेत. भट्टया पेटविण्यासाठी जागा राहिलेली नसून, मोकळ्या जागेवर भट्टी पेटवल्यास त्यातून निघणाऱ्या धूरांमुळे प्रदूषण होत असल्याने या भट्टया बंद कराव्या लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कल्याणात भगवा तलावाजवळ असलेली भट्टी आजही सुरू असली तरी या भट्टीत तयार होणाऱ्या पणत्या मागणीप्रमाणे पुरेशा नसल्याने ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी गुजरात मधून पणत्यांची आयात करावी लागत असल्याचे विक्रेत्यानी संगितले.

दिवाळीत छोट्या चुली आणि दळण दळण्याच्या जात्याची देखील पूजा केली जाते. या वस्तु देखील पूर्वी काळ्या मातीपासून तयार केल्या जात असत मात्र आता भट्टी नसल्याने या वस्तू माती ऐवजी पीओपी पासून तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. पीओपी घातक आहे हे माहीत असले तरी दुसरा पर्याय नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले सांगितले.

हे सुद्धा वाचा

गुजरातवरून मागवलेल्या पणत्या

गुजरातमध्ये होते मोठ्या प्रमामात उत्पादन

कलाकुसर केलेल्या पणत्या तसेच वेगवेगळ्या आकाराचे आकर्षक दिवे हे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. असे दिवे तयार कण्यासाठी व्यापाऱ्यांना गुतवणूकही मोठी करावी लागते शिवाय मनुष्यबळाचीही मोठ्या प्रमाणात गरज असते. व्यावसायाचे हब असलेल्या गुजरातमध्ये अनेकांनी मोठी गुंतवणूक करून हे आकर्षक माताचे दिवे तयार करण्याचे कारखाने उभारले आहेत. या दिव्यांना भारतातील इतर भागातून मोठी मागणी असल्याने त्याची निर्यात केली जाते.