“गेल्या अनेक वर्षांपासून सीमावादावर तोडगा निघाला नाही”; पण आता मात्र…; एकनाथ शिंदे थेट अमित शहांचे आभारच मानले

| Updated on: Dec 15, 2022 | 6:54 PM

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील कोणत्याही नागरिकांना त्रास देऊ नका अशा सूचना देऊन सीमाभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीही समिती स्थापन करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सीमावादावर तोडगा निघाला नाही; पण आता मात्र...; एकनाथ शिंदे थेट अमित शहांचे आभारच मानले
Follow us on

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा राजकीय मुद्दा नाही तर हा मुद्दा सामाजिक बांधिलकीचा प्रश्न असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर दोन्ही राज्यांच्या झालेल्या बैठकीमधीलही त्यांनी महत्वाच्या मुद्यावर झालेली चर्चा सांगितली. यावेळी त्यांनी मागील काँग्रेस सरकारवरही टीका केेली. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून सीमावाद प्रश्न रेंगाळत ठेवला होता.

मात्र आता हा प्रश्न न्यायप्रविष्ठ असतानाही थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष घालून प्रश्न लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टिकेलाही प्रत्युत्तर देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला विश्वास आणि प्रश्न सोडवण्यासंदर्भात झालेल्या हालचाली आशादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.

सीमाभागात असणाऱ्या मराठी भाषिकांना कोणताही त्रास न देण्याचा सूचना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. हा प्रश्न राजकीय नसून सामाजिक बांधिलकीचा असल्याने कोणत्याही मराठी बांधवांना कन्नड भाषिकांनीही त्रास देऊ नये अशा सूचना अमित शहा यांनी दिल्या आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील कोणत्याही नागरिकांना त्रास देऊ नका अशा सूचना देऊन सीमाभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीही समिती स्थापन करण्यात येणार आहे.

या समितीमध्ये तीन महाराष्ट्राचे मंत्री आणि ती कर्नाटकचे मंत्री , तीन उच्च पदस्थ अधिकारी या समितीत असणार आहेत. सीमाभागातील मराठी माणसांना काही त्रास होत देण्यात येत असेल, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ही समिती सीमाभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याबद्दलही अमित शहा यांच्याबरोबर चर्चा केली आहे. बोम्मई यांचे हे ट्विट त्यांनी स्वतः केले नसून असं ट्विट कोणी केले त्याचा शोध घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.