मुंबई | 20 February 2024 : राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना (MARD) आणि राज्य सरकारमधील शीतयुद्ध काही थांबायचे नाव घेताना दिसत नाही. यापूर्वी राज्य सरकारने डॉक्टरांची यशस्वी मनधरणी केली होती. 7 फेब्रुवारी रोजी मार्डने संपाची हाक दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा झाली. यशस्वी वाटाघाटी झाल्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच दिवशी संप मागे घेत असल्याची घोषणा केली होती. आता मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणीच केली नसल्याचा आरोप करत निवासी डॉक्टर गुरुवारपासून संपावर जात आहे.
गुरुवारी संध्याकाळपासून संप
२५ वैद्यकीय महाविद्यालयात संपाचा परिणाम
सरकारने बैठकीत आश्वासन दिले. पण आता सरकारने घुमजाव केल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे, त्यामुळे गुरुवारपासून निवासी डॉक्टर संध्याकाळपासून संपावर जाणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे.राज्यात सध्याच्या घडीला एकूण २५ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या काळात तत्काळ विभागातील सर्व सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्यावर्षी घेतला होता संप मागे
मार्डने गेल्या वर्षी सुद्धा संपाची हाक दिली होती. आश्वासनानंतर 3 जानेवारीला संप मागे घेण्यात आला होता. सरकारने आश्वासनाकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली आहे. आश्वासन देऊन आता ३९३ दिवस उलटले, आजपर्यंत २८ पत्र पाठविण्यात आली. पण सरकारने कशाचीच दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.