Doctor Strike | निवासी डॉक्टर जाणार संपावर; मार्डसोबत सरकार करणार बोलणी

| Updated on: Feb 07, 2024 | 9:48 AM

Doctor Strike | राज्यातील निवासी डॉक्टरांनी आज संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारशी वाटाघाटी फिसकटल्यातर संध्याकाळी डॉक्टर संपावर जातील. मार्डसोबत सरकार बैठक घेणार आहे. त्यानंतर संपाबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व डॉक्टर संध्याकाळी पाच वाजेनंतर बेमुदत संपावर जातील.

Doctor Strike | निवासी डॉक्टर जाणार संपावर; मार्डसोबत सरकार करणार बोलणी
Follow us on

मुंबई | 7 February 2024 : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या अनेक मागण्या आहेत. त्या मागण्यांना राज्य सरकार वारंवार वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम करत असल्याने आता डॉक्टरांची संघटना मार्ड पुन्हा एकदा बेमुदत संपाचे हत्यार उपणार आहे. या मागण्यांबाबत दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत संघटनेचे चर्चा होईल. मागण्यांबाबत सरकारच्या भूमिकेनंतर संपाचा निर्णय घेण्यात येणार आहे. वाटाघाटी फिसकटल्या तर राज्यातील सर्व डॉक्टर संध्याकाळी पाच वाजेनंतर बेमुदत संपावर जातील.

आज दुपारी बैठक

निवासी डॉक्टर संघटना आणि राज्य सरकार यांच्यात आज दुपारी 2.30 वाजता मंत्रालयात बैठक होऊ घातली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही बैठक बोलावली आहे. निवासी डॉक्टरांच्या मागण्याबाबत अजित पवार आणि संघटनेमधील प्रतिनिधीमध्ये आज चर्चा होणार आहे. यापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे मार्ड आंदोलनावर ठाम आहे. आजच्या बैठकीत मागण्या मान्य झाल्या नाही तर निवासी डॉक्टर आंदोलणावर ठाम आहेत. संध्याकाळी 5 वाजता निवासी डॉक्टर भूमिका घेतली.

हे सुद्धा वाचा

गेल्यावर्षी घेतला होता संप मागे

मार्डने गेल्या वर्षी सुद्धा संपाची हाक दिली होती. आश्वासनानंतर 3 जानेवारीला संप मागे घेण्यात आला होता. सरकारने आश्वासनाकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली आहे. आश्वासन देऊन आता ३९३ दिवस उलटले, आजपर्यंत २८ पत्र पाठविण्यात आली. पण सरकारने कशाचीच दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संपाचा इशारा देण्यात आला आहे.

निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय

१. निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.

२. निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.

३. निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे.

४. या मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर सायंकाळी पाच वाजल्यापासून बेमुदत संपावर जातील.