मुंबई : नोटांवर काही- बाही लिहायची तुम्हाला सवय आहे का? तर ही आहे तुमच्यासाठी महत्वाची बातमी.. नोटांवर नाव लिहिणे किंवा आकडे लिहिण्याची भारतीयांची आवडती सवय आहे. नोटांवर पेनाने लिहिल्यास त्या चलनातून बाद करण्यात येतील असे व्हॉट्सअप संदेश फिरत असतात. परंतू सरकारने आता स्पष्ट केले आहे. काय ते पाहूया…
भारतीय नोटांवर हिशेब लिहित असतात. किंवा लक्षात राहण्यासाठी देखील नोटांचाच आधार घेतला जातो. नोटांची गड्डी मोजल्यावर त्यावर किती रक्कम झाली याचीही नोंद केली जाते.
यासंदर्भात मागे व्हॉट्सअपवर यापुढे अशाप्रकारे 2000, 500, 200 आणि 100 रूपयांच्या नोटांवर लिहिल्याने त्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार आहेत अशा आशयाच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचा गैरसमज दूर करण्यासाठी सरकार पुढे आले आहे.
चलनी नोटांवर काही गिचमिड अक्षरांत लिहिणे तुम्हाला जरी आवडत असले तरी रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की अशा प्रकारे नोटांवर लिहिल्याने नोटा अवैध ठरत नाहीत किंवा चलनातून बादही केल्या जाणार नाहीत.
मात्र अशाप्रकारे नोंटावर लिहिणे अयोग्य आहे. नागरीकांनी अशाप्रकारे नोंटांवर लिहिल्याने त्या घाण विद्रुप होऊन त्यांचे आयुष्य देखील कमी होते. त्यामुळे नोटांवर लिहू नये हेच चांगल्या नागरिकाचे कर्तव्य आहे असे सरकारने स्पष्ट केले आहे.
Does writing anything on the bank note make it invalid❓#PIBFactCheck
✔️ NO, Bank notes with scribbling are not invalid & continue to be legal tender
✔️Under the Clean Note Policy, people are requested not to write on the currency notes as it defaces them & reduces their life pic.twitter.com/V8Lwk9TN8C
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 8, 2023