आंबेडकरांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसागर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६२ वा महापरिनिर्वाण दिन. या निमित्ताने लाखों अनुयायी दादर येथील शिवाजी पार्क येथे असणाऱ्या चैत्यभूमीवर आले आहेत. आजच्या दिवशी महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक चैत्यभूमीवर येतात. बुधवारी मध्यरात्रीपासूनच अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी करायला सुरुवात केली. समता सैनिक दलाने पथसंचलन करुन मध्यृरात्री 12 वाजता […]

आंबेडकरांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसागर
Follow us on

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६२ वा महापरिनिर्वाण दिन. या निमित्ताने लाखों अनुयायी दादर येथील शिवाजी पार्क येथे असणाऱ्या चैत्यभूमीवर आले आहेत. आजच्या दिवशी महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक चैत्यभूमीवर येतात. बुधवारी मध्यरात्रीपासूनच अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी करायला सुरुवात केली. समता सैनिक दलाने पथसंचलन करुन मध्यृरात्री 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. समता सैनिक दलाचे साडे पाच हजारहून अधिक स्वयंसेवक चैत्यभूमीवर आहेत.

या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही चैत्यभूमीवर हजेरी लावली.

डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातूनच नाही तर संपूर्ण देशातून भीमसैनिक मुंबईत येत आसतात. सोमवारपासून हे भीमसैनिक चैत्यभूमीवर दाखल होत होते. अनुयायांची होणारी गर्दी पाहता मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्रशासन आणि मुंबई पोलिसांनी त्यांच्या सुविधा, सुरक्षेची खबरदारी बाळगली.

या अनुयायांसाठी शिवाजी पार्क येथे एक लाख चौरस फुटांचा मंडप बांधण्यात आला आहे. त्यासोबतच अनुयायांना मैदानात राहण्याची आणि त्यांच्या खाण्या-पिण्याची सोयही करण्यात आली आहे.

लाखोंच्या संख्येने येणारे अनुयायी पाहता कुठल्याही प्रकारचा अपघात घडू नये यासाठी दादर आणि माहिम स्थानकांवर अनुयायी नीट उतरतील याची खात्री करुन घेतल्यानंतरच लोकल पुढे नेण्यात यावी, असे आदेश मोटरमनला देण्यात रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

सुरक्षेची व्यवस्था :

* मुंबईतील दादर, माहिम परिसरात विशेष पोलीस व्यवस्था

* आरपीएफ, सीआरपीएफचे जवानही विविध ठिकाणी तैनात

* शिवाजी पार्क येथे शामियाना, व्हीआयपी कक्ष तसेच नियंत्रण कक्षाची व्यवस्था

* चर्चगेट, दादर, बोरिवली, अंधेरी या भागांमध्ये विशेष मदत केंद्र

* दादर, माहिम रेल्वे स्थानकांवर उतरल्यानंतर चैत्यभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर जागोजागी वाट दाखवणारे दिशादर्शक, मार्ग दाखवणारे फलक

* चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ तसेच सूर्यवंशी सभागृह मार्ग येथे रुग्णवाहीकेसोबत आरोग्यसेवेची व्यवस्था

* शिवाजी पार्क मैदानात 18 फिरती शौचालय

* 380 पिण्याच्या पाण्याच्या नळांची व्यवस्था

* अग्निशमन दल उपस्थित

* मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण

* चौपाटीवर सुरक्षारक्षकांसह बोटींची व्यवस्था

* शिवाजी पार्क येथे एक लाख चाैरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा

* या शामियान्यामध्ये जवळपास 300 माेबाइल चार्जिंग पाॅइंट बसवण्यात अाले

* 469 खाण्या-पिण्याच्या स्टॉलची व्यवस्था

* स्काऊट गाईड हॉलमध्ये भिक्कूंच्या थांबण्याची व्यवस्था

* स्नानगृहांची व्यवस्था

* 2000 पोलिसांचा फौजफाटा तैनात