मी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो, आंबेडकरांचं पोस्टर फाडण्याबाबत जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

| Updated on: May 29, 2024 | 3:55 PM

मनुस्मृतीचे दोन श्लोक शालेय अभ्याक्रमात घेतल्याने याच्या निषेध करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड महाडमधील चवदार तळ्यावर गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्याहातून आंबेडकर यांचं पोस्टर फाडलं गेल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

मी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो, आंबेडकरांचं पोस्टर फाडण्याबाबत जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण
Follow us on

राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यभरातून विरोध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळ्याच्या ठिकाणी जात मनुस्मृती दहन करत निषेध नोंदवला. यादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडलं गेलं, यामुळे राज्यभरातून आव्हाडांवर टीका होत आहे. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी यावर स्पष्टीकरण देताना महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आम्ही महाडला मनुस्मृती दहन करण्यासाठी आलो होतो. कारण ज्या मनुस्मृतीमधे महिलांच्या संदर्भात अत्यंत खालच्या भाषेत लिहण्यात आलं आहे, त्या मनुस्मृती मधील श्लोक जर पाठ्यपुस्तकात येत असेल तर आम्ही त्याचा विरोध करत असताना अनावधानाने माझ्याकडून आणि माझ्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडण्यात आले.  त्यासंदर्भात मी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो आणि मी कधी माझ्या भूमिके पासून मागे हटत नाही पण आता मी माफी मागत आहेत त्यामुळे यामागची भावना आपण समजू शकता, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जाहीर निषेध !जाहीर निषेध! स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

 

नेमकं काय घडलं?

दरम्यान, जितेंद्र आव्हाड मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी महाडमधील चवदार तळ्याजवळ गेले होते. त्यावेळी मनस्मृतीचे पोस्टर फाडण्यात आले. यादरम्यान त्यांच्याकडून आणि कार्यकर्त्यांकडून बाबासाहेब यांचं फोटो असलेलं पोस्टरही फाटल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. परंतु आव्हाडांनी त्यावेळीच आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली होती.