मुंबई : जागतिक दर्जाचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांची ख्याती आणि किर्ती सर्वांनाच माहिती आहे. एक लाख 60 हजार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. रुग्ण बरा होण्यासाठीची डॉ. लहाने यांची धडपड आपण अनेकवेळा पाहिलेली आहे. त्याचे अनेक किस्से सांगितले जातात. असाच एक किस्सा डॉ. तात्याराव लहाने विधिमंडळाच्या आवरात असलेल्या भोजनालयात चहा घेत पाहायला मिळाला. (Dr. Tatyarao Lahane checking eye of patients in Vidhan bhavan video gone viral)
डॉ. तात्याराव लहाने हे राज्याच्या डीएमईआर विभागाचे संचालक आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे त्यांना कामाच्या निमित्ताने अनेकवेळा विधिमंडळात यावे लागते. त्यांच्यासोबत नेहमीच फायलींचा गठ्ठा असतो. आज थोडी उसंत मिळाल्यामुळे तसेच पुढील कामाचा आढावा घेण्यासाठी ते विधीमंडळाच्या आवारात असलेल्या कँटीनमध्ये पोहोचले. यावेळी समोर तात्याराव लहाने समोर बसलेले बघितल्यानंतर एका वेटरने त्यांना चहा आणून दिला. आणि लगेच तात्याराव यांना त्याच्या डोळ्या संदर्भातल्या समस्या सांगितल्या.
….आणि कँटिनचे रुपांतर रुग्णालयात झाले
यावेळी तात्याराव यांनी सगळा शिण बाजूला ठेवून तिथेच खिशातला मोबाईल काढला आणि मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात त्या वेटरचे डोळे तपासले. त्यांनी त्या वेटरला काही औषधी लिहून दिल्या. त्यानंतर तात्याराव लहाने उपचार करत असताना दिसल्यावर काही क्षणांत तिथे कँटिनमध्ये काम करणारे इतर वेटरही जमा झाले. त्यांनीसुद्धा लहाने यांना आपल्या डोळ्यांच्या समस्या सांगितल्या. आपल्यासमोर झालेली गर्दी लक्षात येताच त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता; टेबलवर ठेवलेला फाईलीचा गठ्ठा बाजूला सारला. तिथेच लहाने यांनी सर्वांना तपासायला सुरू केले आणि बघता बघता विधिमंढळातील कँटिनचे रुपांतर ओपीडी विभागात झाले.
दरम्यान, डॉ. तात्याराव लहाने यांच्या आपल्या समर्पणाची पुन्हा एकदा प्रचिती येथे आली. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
डॉ. तात्याराव लहाने विधिमंडळात रुग्णांना तपासताना, पाहा व्हिडीओ :
इतर बातम्या :
Chandrakant Patil | …तर मराठा आरक्षण सरकार टिकवू शकेल – चंद्रकांत पाटील
(Dr. Tatyarao Lahane checking eye of patients in Vidhan bhavan video gone viral)