मुंबई महापालिका लागली निवडणुकीच्या कामाला, त्या 45 वॉर्डांचं काय होणार?

| Updated on: Sep 24, 2021 | 12:36 PM

राज्यसरकारने महापालिका निवडणुकीच्या प्रभागपद्धतीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुंबई महापालिकाही कामाला लागील आहे. महापालिका आयुक्तांनी पालिकेच्या वॉर्ड आणि झोपडपट्ट्यांचा आढावा घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Draft of verification of corporator ward boundaries to be ready in 15 days, says BMC)

मुंबई महापालिका लागली निवडणुकीच्या कामाला, त्या 45 वॉर्डांचं काय होणार?
मुंबई महापालिका
Follow us on

मुंबई: राज्यसरकारने महापालिका निवडणुकीच्या प्रभागपद्धतीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुंबई महापालिकाही कामाला लागील आहे. महापालिका आयुक्तांनी येत्या 15 दिवसात पालिकेचे वॉर्ड आणि झोपडपट्ट्यांचा आढावा घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, भाजपने आपल्या फायद्यासाठी 45 वॉर्डाची रचना बदलली होती असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. त्या वॉर्डांचं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Draft of verification of corporator ward boundaries to be ready in 15 days, says BMC)

मुंबई महापालिका लागली निवडणुकीच्या कामाला लागली आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डात वस्ती, झोपडपट्टी, इमारती याचा आढावा घेण्याचे प्रत्येक सहाय्यक आयुक्तांना आयुक्तांनी आदेश दिले आहेत. महापालिका 227 वॉर्डांचा कच्चा आराखडा तयार करणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने माहिती मागवली तर ती दिली जाणार आहे. मुंबईत कॉग्रेसकडून 40 ते 45 वॉर्डच्या पुनर्रचनेची मागणी केली आहे. काँग्रेसची ही मागणी पूर्ण केली जातेय का हे बघावं लागणार आहे.

सीमा तपासल्या जाणार

मुंबईत सर्व वॉर्डांच्या सीमा तपासल्या जातील हे आधीच निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. तसं काम आता पालिकेकडून सुरू करण्यात आलं आहे. भाजपने बदल केलेल्या वॉर्डांची पुनर्रचना करावी ही काँग्रेसची पहिल्यापासूनची मागणी आहे. भाजपने स्वतःसाठी हा बदल केला होता, असा आरोप काँग्रेसने केला होता. त्यामुळे प्रभाग रचनेचा निर्णय झाल्यानंतर 45 वॉर्डची फेररचना केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते रवी राजा यांनी केली आहे.

भूखंडांवरील चाळी, वसाहतींचा पुनर्विकास रखडणार?

मुंबईमध्ये पालिकेचे अनेक भूखंड असून त्यापैकी काही भूखंडांवर चाळी आणि वसाहती उभ्या आहेत. त्याचा पुनर्विकास करण्यासाठी सुधार समिती आणि महापालिका सभागृहाची मंजुरी बंधनकारक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ ठरण्याची भीती आहे. या भूखंडावरील चाळी आणि वसाहतींच्या पुनर्विकासाचा एकमुखी निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका सभागृहात घेतला आहे. प्रशासनाचा विरोध डावलून नगरसेवकांनी हे सुधारित धोरण उचलून धरले आहे. मात्र, या निर्णयामुळे पुनर्विकासास विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबईमध्ये पालिकेचे अनेक भूखंड असून त्यापैकी काही भूखंडांवर चाळी आणि वसाहती उभ्या आहेत. या चाळी व वसाहतींच्या पुनर्विकासासाठी पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडून परवानगी दिली जाते. मात्र भविष्यात या भूखंडांवरील चाळी, वसाहतींच्या पुनर्विकासाला सुधार समिती आणि पालिका सभागृहाची अंतिम परवानगी घ्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाचा परवानगी कालावधी वाढण्याची शक्यता आहे, असा दावा करत प्रशासनाने या निर्णयाला विरोध केला. प्रशासनाचा विरोध डावलून सभागृहाने एकमताने याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. (Draft of verification of corporator ward boundaries to be ready in 15 days, says BMC)

 

संबंधित बातम्या:

जसा समीर, पंकज तसाच सुहास, एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे; भुजबळ-कांदे वादावर राऊतांचा सल्ला

VIDEO: मित्र मित्राला मिठी मारणार नाही तर कुणाला मिठी मारणार?; फडणवीसांच्या गळाभेटीवर पटोलेंचा सवाल

पुण्यात भर दुपारी थरार, मनोरुग्णाची 35 फूट उंच होर्डिंगवरुन उडी

(Draft of verification of corporator ward boundaries to be ready in 15 days, says BMC)