मुंबई – राज्यात गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काही दिवसांवर आलेला गणेशोत्सवाची तयारी सध्या जोरात सुरु आहे. राज्यात अनेक मंडळांनी पोलिसांची परवागनी (Police Permission) देखील घेतली आहे. त्याचबरोबर प्रत्येक नगरात सध्या गणपतीचे मंडप उभारले आहेत. तसेच गणेश मंडळांनी आपली मुर्ती देखील मंडपात नेऊन ठेवली आहे. त्याचबरोबर अनेक मंडळ त्यांच्या तयार झालेल्या मुर्त्या घेऊन जात जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतुक कोंडी पाहायला मिळत आहे. मागच्या आठ दिवसांपासून पुर्वद्रुतगती मार्गावर वाहतुकीचा खोळंबा (Traffic) आहे.
दरवर्षी या रस्त्यावर ट्रफिक असतं, यावर्षी सुद्धा तिथं ट्रफिक असल्यामुळे पोलिस प्रशासनावरती जोरदार टीका होऊ लागली आहे. सकाळपासून मुंबईत अनेक ठिकाणी ट्रॅफिक आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मागच्या दोन वर्षापुर्वी चिंतामणी गणपतीच्या आगमन सोहळ्यावेळी मोठी वाहतुक कोंडी झाल्याने टीका झाली होती. आज सद्धा त्याचपध्दतीने वाहतुक कोंडी झाल्यामुळे नागरिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरती टीका करीत आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून गणपती सोहळा महाराष्ट्रात सुरु झाला की वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी पुन्हा वाहतुक कोंडी झाल्यामुळे पोलिस प्रशासन पुन्हा चर्चेत आलं आहे.