मुंबई | 24 ऑक्टोबर 2023 : आज दसऱ्याचा सण आहे आणि दसरा मेळावा ही शिवसेना पक्षाची परंपरा आहे. दसरा मेळावा म्हणजे धडाकेबाज भाषणं… यंदा मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. फूट पडल्यापासून शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. तसंच परळीतील भगवान भक्तीगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. तर नागपुरात विजयादशमी उत्सव साजरा होतोय. तिथं सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करत आहेत.
दादरमधील शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची झलक आजच्या सामना अग्रलेखातून पाहायला मिळाली. अहंकाराचा नाश होईल, असं म्हणत सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण चर्चिलं जाणार, असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवाजी पार्कमधील या सभेचा टीझर प्रदर्शित झाला आहे. आपलं शिवतीर्थ सजतंय, तुमच्या स्वागतासाठी!, असं म्हणत हा टीझर ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आला आहे.
आपलं शिवतीर्थ सजतंय,
तुमच्या स्वागतासाठी! pic.twitter.com/7ACJFJq5dX— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2023
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचा हा दुसरा दसरा मेळावा आहे. तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर हा पहिला दसरा मेळावा होतोय. आझाद मैदानावरील सभेच्या तयारीचा एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिमगा मेळावा ठरेल, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. त्यामुळे आजच्या सभेत एकनाथ शिंदे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल.
#शिवसेना #दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला मुंबईतील आझाद मैदानाला भेट देऊन येथे करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला तसेच केलेल्या आयोजनात काही बदल सुचवले.
वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांचे विचार आणि वंदनीय गुरुवर्य #धर्मवीर #आनंद_दिघे #साहेब यांची… pic.twitter.com/roUhJmbNYV
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 23, 2023
परळीतील भगवान भक्ती गडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये डावललं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशातच पंकजा यांनी नुकतंच शिवशक्ती परिक्रमा यात्रा केली. यावेळी त्यांनी आपली शक्ती दाखवून दिली. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होतोय. या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार? याकडे महाराष्ट्रावचं लक्ष आहे.
दसरा टिझर – माझी संपत्ती…#AaplaDasara #AapliParampara #BhagwanBhaktigad #Sawargav #आपला_दसरा_आपली_परंपरा pic.twitter.com/R2KWZGsSnr
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 23, 2023
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज विजयादशमी उत्सव पार पडतोय. काही वेळाआधी विजयादशमीनिमित्त पथसंचलन पार पडलं. यात सरसंघचालक मोहन भागवत हे संबोधित करत आहे. G-20 वर भाष्य केलं. G-20 चा विचार आता मानव केंद्रीत झाला आहे. भारताने या परिषदेचं यजमानपद भूषवलं ही अभिमानास्पद बाब आहे, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.