Naresh Goyal : नरेश गोयल यांना या तारखेपर्यंत ईडी कोठडी, काय आहे प्रकरण?

| Updated on: Sep 02, 2023 | 6:45 PM

कॅनरा बँकेत ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता आणि कंपनीच्या काही अधिकाऱ्यांवर आरोप आहे. १ हजार ४१० कोटी रुपये कंपनीने कमिशन स्वरुपात पैसे परदेशात पाठवण्याचाही आरोप आहे. बँकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

Naresh Goyal : नरेश गोयल यांना या तारखेपर्यंत ईडी कोठडी, काय आहे प्रकरण?
Follow us on

मुंबई, २ सप्टेंबर २०२३ : जेट एअरवेजचे संस्थापक अध्यक्षांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. ईडीने नरेश गोयल यांना अटक केली. त्यांच्यावर ५३८ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा आरोप आहे. ई़डीच्या अधिकाऱ्यांनी नरेश गोयल यांना चौकशीसाठी शुक्रवारी बोलावले होते. यापूर्वी नरेश गोयल दोन वेळा ईडीसमोर हजर झाले नव्हते. ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी करून नरेश गोयल यांना अटक केली. अटक केल्यानंतर ईढीने १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. नरेश गोयल यांना 11 सप्टेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आलं. गोयल यांना मनी लाँडरींगमध्ये मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे.

ईडीने केली कोठडीची मागणी

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ५ मे रोजी नरेश गोयल यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयासह सात ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. ७४ वर्षीय नरेश गोयल यांनी मुंबईतील पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं. ईडीने नरेश गोयल यांच्या कोठडीची मागणी केली.

हे सुद्धा वाचा

बँकेत ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

कॅनरा बँकेत ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता आणि कंपनीच्या काही अधिकाऱ्यांवर आरोप आहे. १ हजार ४१० कोटी रुपये कंपनीने कमिशन स्वरुपात पैसे परदेशात पाठवण्याचाही आरोप आहे. बँकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. गोयल यांनी वैयक्तिक खर्चासाठी, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी, फोन बील तसेच वाहन खर्चासाठी क्रेडिटची रक्कम वापरली.

टॅक्स वाचवण्यासाठी फसवणूक

फारेन्सिंक ऑडिटदरम्यान, जेट एअरवेजने खर्चात फसवणूक केली. बँकेतून मिळालेल्या क्रेडीटचा दुरुपयोग केला. २५ वर्षांनंतर जेट एअरवेज २०१९ मध्ये बंद पडली. जेट एअरवेज कर्जात बुडाली. नरेश गोयल यांच्यावर परदेशी कंपन्यांवर नियंत्रण ठेवल्याचा आरोप आहे. कंपनीने काही ट्रान्झेक्शन परदेशातही केले. टॅक्स वाचवण्यासाठी त्यांनी विदेशी कंपन्यांशी देवाण-घेवाण केल्याचाही आरोप आहे. ईडी कोठडीदम्यान अधिकारी त्यांच्याकडून आणखी काही माहिती मिळते का, याचा तपास करतील. त्यानंतर इतर आरोपींना रडारवर घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बँकेची फसवणूक केल्याचा नरेश गोयल यांच्यावर आरोप आहे.