मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग (NSE Phone Tapping) प्रकरणात आधी त्यांच्या विरोधात ईडी (ED Enquiry) आणि सीबीआयने गुन्हे दाखल केले आणि आता पांडे यांना ईडी कडून चौकशीसाठी दुसरा समन्स आलाय. त्यांना उद्या ईडी समोर चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पांडे यांच्या अडचणी आणखी किती वाढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे याच प्रकरणात चित्रा रामकृष्णन यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात आणखी काही जणांना अटक झाल्याची माहितीही समोर आली आहे. जसजसा तापस पुढे जाईल तसतशी या प्रकरणातील अटक होणाऱ्यांची सख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच ईडीने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होत.ृ तसेच स्टॉक एक्स्चेंजच कर्मचाऱ्यांच्या अवैध फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणात पांडे यांच्या विरोधात मनी लाँड्रिंग कायद्यानुसार हा गुन्हा दाखल केला असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच दुसरीकडे यापूर्वी सीबीआयनेही पांडेंविरोधात गुन्हा दाखल केला होता. नारायण आणि रामकृष्ण या दोघांनी शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे फोन अवैधरित्या टॅप केल्याचा आरोप आहे. या कामासाठी मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी स्थापन केलेल्या एका कंपनीची मदत घेतली होती, असा आरोप पांडे यांच्यावर करण्यात आलाय. त्यामुळे याच प्रकरणात आता त्यांच्यामागे चौकशीचा फेरा लागला आहे.
या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून अजून काही खळबळजनक खुलासेही करण्यात आले आहेत. तसेच याच प्रकरणात महिला व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबतही काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या मांत्रिकाच्या आधाराने अनेक काम ठरवत असल्याच्याही चर्चा समोर आल्या आहेत. संजय पाडे हे सेवेत असतानाही कायम चर्चेत राहिले आहेत. त्यांची नाराजीही अनेकदा उघडपणे बाहेर आली आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही यावरून पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच याच प्रकरणाचा पाठपुराव करत सोमय्या हे आज दिल्ली दाखल झाले होते. त्यामुळे हे प्रकरण कोणतं वळण घेतंय हेही पाहणं तितकेच महत्वाचे ठरणार आहे.