मुंबई : आजची पाहट ही राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणारी ठरली आहे. कारण शिवसेनेच सर्वात जुने आणि भरोशाच्या सहकारी असणारे एकनाथ शिंदे हेच अचानक नॉट रिचेबल झाले. मात्र ते रिचेबल झाले तेव्हा ते सुरतमध्ये असल्याचे कळाले. त्यांच्यासोबत सेनेचे अनेक आमदार असल्याचीही माहिती समोर आली. त्यानंतर सेनेत पुन्हा एकदा मोठी फूट पडत असल्याचे चित्र निर्माण झालं. शिवसेनेत अशी अचानक फूट पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधाही काही दिग्गज नेते हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बाहेर पडले आहेत. त्यातली पाच नावं तर सध्या राज्याच्या राजकारणाच्या क्षितीजावर सतत गाजत असतात. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ अशा नेत्यांचा समावेश आहे.