मुंबई : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाकडून (Eknath Shinde Group) मुंबई महानपालिकेतील (Bmc Shiv Sena Office) शिवसेना कार्यालयावर कब्जा केला आहे. शिंदे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी महापालिकेतील कार्यालय ताब्यात घेतला आहे. यावेळेसे शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळेस स्वत: खासदार राहुल शेवाळे, शितल म्हात्रे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, यशवंत जाधव, अशोक जाधव आणि इतर नेते उपस्थित होते. (eknath shinde group sequestration on to shiv sena thackeray group office in bmc headquarters mumbai news)
राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते सातत्याने आमनेसामने येत आहेत. अवघ्या काही महिन्यांपूर्वी प्रभादेवीत दहीहंडीलाही दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यानंतर आता महापालिका मुख्यालयात दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. शिंदे गटाकडून ठाकरे गटाचं कार्यालय ताब्यात घेतलं. यानंतर ठाकरे गटही आक्रमक झालं.
दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. दोन्ही गटात बाचाबाची झाल्याचंही पहायला मिळालं. कोणताही पेचप्रसंग उद्भवू नये यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. तसेच कार्यकर्त्यांना मुख्यालयातून बाहेर काढलं. या सर्व प्रकारादरम्यान मुख्यालयाबाहेर एकच गर्दी झाली होती.