Sanjay Raut : शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही…संजय राऊतांनी हाणला टोला, अजित पवारांच्या भूमिकेविषयी मोठे भाष्य

| Updated on: Mar 29, 2025 | 11:09 AM

Sanjay Raut Criticized Shinde Sena : कॉमेडियन कुणाल कामरा हा काय गद्दार आहे का? असा चिमटा खासदार संजय राऊतांनी काढला. आपण त्याच्याशी बोलल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी शिंदे सेनेवर आज झालेल्या पत्र परिषदेत चौफेर टीका केली. काय म्हणाले राऊत?

Sanjay Raut : शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही...संजय राऊतांनी हाणला टोला, अजित पवारांच्या भूमिकेविषयी मोठे भाष्य
संजय राऊतांचा हल्लाबोल
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
Follow us on

उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली. एकनाथ शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून काही आम्ही बोलू नये का? आम्हालाही मोदी, शाह हे महाराष्ट्राचे शत्रू वाटतात. तरीही शिंदे गट त्यांच्याशी बोलतो, असा चिमटा राऊतांनी काढला. आज सकाळी घेतलेल्या पत्र परिषदेत त्यांनी शिंदे सेनेवर चौफेर टीका केली. कुणाल कामरा हा काय गद्दार आहे का? असा सवाल करत त्यांनी शिंदे सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

कुणाल कामराशी कालचं बोललो

यावेळी कुणाल कामरा याच्याशी कालच बोलल्याचे राऊत म्हणाले. सध्याच्या परिस्थितीवर बोलताना, आपण कायद्याला सामोरं जायला हवं, असा सल्ला राऊतांनी कामरा याला दिला. कुणाल कामरा याच्याशी संपर्क असल्याबाबत माध्यमांनी विचारणा केली असता, तो अल कायद्याचा सदस्य आहे का? तो देशद्रोही, दहशतवादी, फुटिरतावादी आहे का? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांना काही बोलू द्या, तो असं काही नाही असे ते म्हणाले. तो एक कलाकार आहे.. तो एक कवी आहे. आणि मी त्याला सांगितले आहे की आपण कायद्याला सामोरे जायला हवे, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.

हे सुद्धा वाचा

त्यांना शत्रू वाटतो म्हणून आम्ही बोलायचे नाही काय?

एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कामरा हा शत्रू वाटतो म्हणून आम्ही त्याच्याशी बोलायचे नाही का? असा सवाल राऊतांनी केला. आम्हालाही वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे या राज्याचे शत्रू आहेत. पण शिंदे गट तर त्यांच्या पायाशी जाऊन बसतो ना, असा चिमटा त्यांनी काढला. आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू असे राऊत म्हणाले. सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्यावर हक्कभंग आणला असेल तर त्यांच्या आमदारांचा हक्क आहे. त्यावर आम्ही उत्तर देऊ असे ते म्हणाले.

कुणाल कामरा अथवा इतर जण हे त्यांचे काम करत आहे. तुमच्यावर टीका केली म्हणून ते देशाचे, राज्याचे शत्रू ठरत नाहीत. तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचे असेल तर त्याच्या पद्धतीत द्या. त्याच्यावर हल्ला करतो, स्टुडिओ तोडतो, ही उत्तर देण्याची पद्धत नाही, अशी चपराक त्यांनी दिली. तर अजित पवारांना हे सगळं मान्य आहे असं दिसत नाही,” असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे.