मराठा आरक्षणाच्या सुनावणीआधी सरकारची काय तयारी? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन, म्हणाले…

| Updated on: Dec 23, 2023 | 10:01 PM

CM Eknath Shinde on Maratha Reservation : राज्य सरकारने सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनला मान्यता मिळाली आहे. आता मराठा आरक्षणावर 24 जानेवारील सुनावणी होणार आहे, त्याआधी सरकारने काय तयारी केलीये? याबाबत एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.

मराठा आरक्षणाच्या सुनावणीआधी सरकारची काय तयारी? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन, म्हणाले...
Follow us on

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्याआधी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनला मान्यता दिली आहे. मराठा आरक्षणावर सुनावणी होणार असून ही सुनावणी 24 जानेवारीला पार पडणार आहे. याआधी राज्य सरकारने काय तयारी केली आहे? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

न्यायालयाने मराठा समाजाला दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाने देखील संयम ठेवला पाहिजे. मराठा आंदोलकांना आणि जरांगे पाटील यांना आता आंदोलन करण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची भावना आणि अशा प्रकारचे आमचं मत आहे. मराठा समाज शैक्षणिक आर्थिक आणि मागास हे सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आमची वकिलांची फौज पूर्णपणे ताकद पणाला लावेल. पूर्ण भक्कमपणे बाजू मांडेल आणि मराठा समाज शैक्षणिक आर्थिक आणि मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

मागासवर्ग आयोग गठीत केलेला आहे, मागासवर्ग आयोग मोठ्या प्रमाणात एम्पिरिकल डेटा गोळा करतोय. मागच्या वेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना युती सरकारने आरक्षण दिलं होतं ते उच्च न्यायालयात टिकलं होतं परंतु मात्र दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात मराठा समाज मागास सिद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीच सरकार अपयशी झालं होतं. हे लक्षात घेऊन मागासवर्ग आयोग डेटा गोळा करतोय त्याचा फायदा सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यास होईल, असंं  शिंदे म्हणाले.

दरम्यान,  मोदी सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि सर्वांनी कायदा सुव्यवस्था आणि शांतता पाळण्याची गरज आहे. ओबीसी आणि इतर समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता आणि काळजी आम्ही घेतोय आणि हीच आमची भूमिका आहे. प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे एमपीएससीच्या अधिसंख्य पदाला मॅटने दिलेली समिती हायकोर्टाने उठवलेली आहे, शेकडो विद्यार्थ्यांना यामध्ये दिलासा मिळालेला आहे, त्यांना सर्वांना नोकऱ्या मिळतील यासाठी देखील आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.