Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेतेपदावरूनही हटवलं, डॅमेज कंट्रोलबाबत बैठकीत चर्चा

| Updated on: Jul 01, 2022 | 11:46 PM

उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाच्या जाण्याने आणखी काही नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता भासत आहे. ते रोखण्याचा प्रयत्न सध्या शिवसेनेकडून सुरू आहे. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरून हटवल्याचेही पत्र समोर आले आहे. 

Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेतेपदावरूनही हटवलं, डॅमेज कंट्रोलबाबत बैठकीत चर्चा
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. या बंडाने ठाकरे सरकारला पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा शिवसेना नेत्यांनाही नव्हती. मात्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) याठिकाणीही सर्वांना धक्का देत एकनाथ शिंदे यांचं नावं हे थेट मुख्यमंत्रिपदासाठी घोषित केलं. या नव्या सरकारचा शपथविधी गुरूवारीच पार पडला. या नव्या सरकारच्या स्थापनेनंतर आज मोतश्रीवरही एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Tackeray) यांच्यासह शिवसेनेतील खासदार उपस्थित होते. मात्र या बैठकीला दोन खासदारांची अनुपस्थितीही होती. खासदार श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी या बैठकीत कुठेच दिसल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाच्या जाण्याने आणखी काही नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता भासत आहे. ते रोखण्याचा प्रयत्न सध्या शिवसेनेकडून सुरू आहे. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरून हटवल्याचेही पत्र समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध कारवाया केल्या त्यामुळे तुम्ही स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले, असेही या पत्रात म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांना हटवल्याचे पत्रं

 

बैठकीत नेमकं काय घडलं?

मातोश्रीवर आठ वाजल्यापासून सुरू झालेली ही खासदाराची बैठक तीन तासांच्या चर्चेनंतर सपली. संघटनेच्या बांधणीसाठी पक्षातील सर्व खासदारांची बैठक घेतली असल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी या बैठकीनंतर दिली आहे. या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या पाठी अजून किती कार्यकर्ते जातील या संदर्भात जिल्हाप्रमुख आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली.  हे संभाव्य डॅमेज थांबवण्यासाठी आता शिवसेनेतील नेते आणि उद्धव ठाकरे हे प्रयत्न करत आहे.

आणखी किती डॅमेज होण्याची भिती?

एकनाथ शिंदे यांच्या गटाने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडारच पाडलं आहे. अपक्ष मिळून जवळपास 50 आमदारांचं ताफा घेऊनच एकनाथ शिंदे यांनी नवं सरकार स्थापन झालं आहे. त्याचा परिणामही साहाजिकच प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ग्राऊंंड लेव्हलाही शिवसेनेला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. ही शिवसेनेला परवडणार नाही. कारण काही दिवसातच राज्यात बड्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागत आहे. या निवडणुकीत आत्ताच्या डॅमेजचा मोठा फटका हा शिवसेनेला बसू शकतो. तसेच आणखी काही महत्वाचे नेतेही सरकारला पाठिंबा दिल्यास शिवसेनेच्या अडचणी आणखील वाढतील. हे लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांचं बंड झाल्यापासून मतोश्रीवर अनेक बैठका पार पडत आहेत. आजच्या बैठकीतल्या चर्चेतला मजकूरही असाच काहीसा राहिला आहे.