मुंबईः बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा (Hindutva) विचार आम्ही पुढे घेऊन जातो आहोत, त्यामुळे शिवसेनेच्या कोणत्याही बंडखोर आमदाराने बंडखोरी केली नाही असे वक्तव्य करत गर्व से कहो हम हिंदू है म्हणत बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी सूरत विमानतळावरून गुवाहाटीकडे प्रस्थान केले. महाराष्ट्रातील विधान सभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला 35 आमदारांचा पाठिंबा आहे असं सूरतमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांनी आपले प्रस्तावही पाठवले होते.
त्यानंतर उशिराने आणि रात्री सव्वा दोन वाजता हॉटेलमधून एकनाथ शिंदेसह 35 आमदारांनी विमानतळाकडे घेऊन जाण्यात आले आहे. तिथून हे आमदार थेट गुवाहाटीकडे चार्टेड विमानाने प्रस्थान (Departure by chartered flight to Guwahati) करणार आहेत. या घटनेमुळे आता राज्यातील पुढील राजकीय घडामोडी काय असणार याकडेच साऱ्याचेंच लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेनेचे नेत एकनाथ शिंदे यांच्यासह 35 बंडखोर नेत्यांनी रात्री सव्वा दोन वाजता हॉटेलमधून सूरत विमानतळाकडे तीन बसमधून या आमदारांनी प्रस्थान केले. ज्या बसमधून बंडखोर आमदारांनी गुवाहाटीकडे प्रस्थान केले, त्या तिन्ही बसना पडदे लावून बसमधील कोणीही आमदार दिसणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. बंडखोर आमदारांना घेऊन जाणाऱ्या तिन्हीही बसना कडेकोट पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता.
बंडखोर 35 आमदारांची बस जेव्हा सूरत विमानतळावर पोहचल्यानंतर शिवसेनेचे मंत्री आणि गटनेते एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले की, शिवसेना आम्ही सोडली नाही आणि सोडणार नाही व हिंदुत्वाबद्दल कोणतीही तडजोड करणार नाही असं स्पष्ट करत त्यांनी गर्व से कहो हम हिंदू है म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जाणार असल्याचे सांगितले.
सूरत विमानतळावर आमदारांची पोहचल्यानंतर त्यातून एका पाठोपाठ एक आमदार उतरत असतानाच चर्चेतील तीन चेहरे अचानक विमानतळावर समोर आले. हे तीन चेहरे भाजपचे असल्याने अनेकानी त्यांना पाहून आश्चर्य व्यक्त केले. मोहित कंबोज, संजय कुटे आणि रवींद्र चव्हाण या भाजपच्या नेत्यांची या बंडखोर आमदारांमध्ये दिसून आल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले होते. एकनाथ शिंदेय यांनी बंडखोर केल्यापासून भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी शिंदे यांच्या बंडखोरीशी भाजपचा काही संबंध नाही असे सांगितले मात्र या बंडखोरीनंतर भाजपचे हे तिन्ही नेते विमानतळावर दिसल्याने ही बंडखोरी करण्यात भाजपचाच हात आहे का असा सवालही उपस्थित करण्यात आला.
बसमधून सर्व आमदारा उतरून विमानतळाकडे जात होते, त्यावेळी प्रत्येक आमदाराची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती झाली पाहिजे असं आमचे मत असल्याची मत त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी शंभूराजे देसाई, बच्चू कडू, अब्दुल सत्तार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली मात्र कोणत्याही बंडखोर नेत्यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. या 35 आमदारांना मोबाईल वापरू नका, कोणाशीही बोलू नका, कोणतेही फोटो व्हायरल करू नका अशा सूचना देण्यात आल्याने कोणत्याही आमदारांनी माध्यमांशी बोलण्यास तयारी दर्शविली नाही. त्यानंतर सर्व आमदार तीन चार्टेड विमानकडे रवाना झाले.