एकनाथ शिंदे यांचा वरळीत आदित्य ठाकरेंना धक्का, वरळीतील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

| Updated on: Oct 02, 2022 | 4:13 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का दिलाय.

एकनाथ शिंदे यांचा वरळीत आदित्य ठाकरेंना धक्का, वरळीतील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
आदित्य ठाकरेंच्या वरळीतील शिवसैनिकही शिंदे गटात
Image Credit source: t v 9
Follow us on

ब्रिजभान जैसवार, Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारी निवासस्थान वर्षावर मोठ्या संख्येत शिवसैनिकांनी प्रवेश केला. मात्र त्याचबरोबर राष्ट्रवादीचेही काही नेते, कार्यकर्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केला. विक्रोळीहून राष्ट्रवादीची ईशान्य मुंबई जिल्हा संघटक सिंड्रेला प्रभू गवळी यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. विक्रोळीच्या जनतेचा अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे महात्मा फुले महापालिका रुग्णालय गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे. आश्वासन देऊनसुद्धा हॉस्पिटलचे पुनर्निर्माण होत नव्हते.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून जाऊन सदर हॉस्पिटलची पाहणी केली. लवकरात लवकर हॉस्पिटलच्या कामाला शुरुवात होणार असं आश्वासन दिले आहे. म्हणून आज शिंदे गटात पक्ष प्रवेश केला असल्याचं सिंड्रेला प्रभू गवळी यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरेंना धक्का

दुसरीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीमध्येच आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का दिलाय. वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील युवा सैनिक आणि शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. आदित्य ठाकरे यांचा हा वरळी मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.

न्याय देण्याचं काम करू

सरकार तुमचं आहे. त्यामुळं तुमचे प्रश्न सोडवायचं काम सरकारला करायला पाहिजे. मी तुमचे प्रश्न नक्की सोडविणार, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं.कारण हे सरकार सर्वांच आहे. सर्वसामान्य लोकांचं आहे. या सरकारमध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, कोळी बांधव सगळे समाज याठिकाणी एकत्र राहतात.

वरळीतून काही कार्यकर्ते यापूर्वी आले. आजही आले मुंबईतून विविध भागातून कार्यकर्ते येत आहेत. जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आपण पुढं जाऊया. त्यांना न्याय देण्याचं काम करू. ही सरकार म्हणून आमची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.