मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये आता उलटफेर होणं काही नवीन राहिलं नाही. दोन वर्षात फुटलेल्या दुसऱ्या राष्ट्रवादी पक्षाची मालकी अजित पवारांकडे देण्यात आली आहे. दुसरीकडे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष आणि चिन्ह गेला आहे. इतंकच नाहीतर निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेत शरद पवार गटाकडूने एक निर्णय घेण्यात आला नाहीतर त्यांंना आणखीन एक झटका बसणार आहे.
शरद पवार गटासाठी धोक्याची घंटा म्हणजे राज्यसभा निवडणुकसाठी उद्या दुपारपर्यंत चार वाजता तीन नावं आणि चिन्ह देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. जर उद्या म्हणजेच बुधवारी चार वाजेपर्यंत हे नाव नाही दिलं तर शरद पवार गट हा निवडणुकीत अपक्ष मानला जाणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाची पुढची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
आमचं नवं आणि नवं नाव हे शरद पवार आहेत. ज्या माणसाने हे बाळ जन्माला घातलं, संगोपण केलं, त्याला न्हाऊ घातलं. त्याला सुसंस्कृतपणा दिला ते सर्व ओढून घेतलं. त्याचं दुख होत नसेल का त्यांना. ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांनीच तटकरेंपासून अजित पवार यांना मंत्रीपद दिलं. कुणाच्या बळावर, पवारांच्याच जीवावर ना असं म्हणत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निर्णय देताना जो निकष लावला तोच निकष शरद पवार यांच्यासाठीही लावण्यात आला. ज्या गटाकडे जास्त आमदार, खासदार त्या गटाकडे पक्ष आणि चिन्ह असा हा निकष होता. त्याचवेळी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे जाणार याची कल्पना शरद पवार गटातील नेत्यांना होती. त्यामुळेच हे नेते अनपेक्षित निकाल नसल्याचे बोलत आहेत.