Eco friendly Bus: एसटी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसही सीएनजीवर सुसाट; महामंडळ होणार पर्यावरण स्नेही

| Updated on: Aug 16, 2022 | 7:45 AM

खास डिझाईन केलेली सीएनजी इलेक्ट्रिक सोबत सीएनजी आणि एलएनजी बसेसची देखील खरेदी करण्यात येणार आहे. सीएनजी बसेस या शहरात कमी लांबीच्या मार्गावर चालविण्यात येतात, परंतु एसटीसाठी खास मोठी इंधन क्षमता असलेली सीएनजी बस डिझाईन करण्यात आली आहे.

Eco friendly Bus: एसटी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसही सीएनजीवर सुसाट; महामंडळ होणार पर्यावरण स्नेही
Follow us on

मुंबई: सध्या इंधनाची दरवाढ (Fuel price hike) आणि पर्यावरणाबाबत सर्वच क्षेत्रात सजगता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे विविध प्रयोग राबवले जात असले तरी सरकारी वाहतूक व्यवस्थेबाबतही आता बदल स्वीकारले जात आहेत. त्यामुळेच सिटीबस बरोबरच आता राज्य परिवहन महामंडळानेही नवेनवे बदल स्वीकारले आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाने आता पारंपारिक इंधनाऐवजी पर्यावरण स्नेही इंधन वापरण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस (Electric buses) सोबतच सीएनजी (CNG) वर धावणाऱ्या बसेसही खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे एसएनजी बसेसना मोठ्या टाक्या बसविण्यात येणारा असून या बसेस किमान 500 किलोमीटर धावतील अशी त्यांची क्षमता असणार आहे. त्यामुळे या बसेस लांब पल्ल्यावर चालविण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या सुत्रांनी दिली आहे. एसटी महामंडळाला आधुनिक बनविण्यासाठी इतर पर्यायी इंधनाचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटीच्या बसेस डिझेल वरच धावतात तसेच डिझेल इंधनामुळे हवेत सर्वाधिक प्रदूषण तर होतेच शिवाय ते परवडत नसल्याने एसटी महामंडळ आर्थिक गर्दीत सापडले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बसेसचा पर्याय पुढे आला आहे.

नगर-पुणे महामार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस

सध्या नगर-पुणे महामार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस धावत आहे, लवकरच ताब्यात उर्वरित इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या बसेस ना मुंबई ते पुणे या फायद्याच्या मार्गावर चालविण्याची योजना आहे.

वाहनाना खास डिझाईन

खास डिझाईन केलेली सीएनजी इलेक्ट्रिक सोबत सीएनजी आणि एलएनजी बसेसची देखील खरेदी करण्यात येणार आहे. सीएनजी बसेस या शहरात कमी लांबीच्या मार्गावर चालविण्यात येतात, परंतु एसटीसाठी खास मोठी इंधन क्षमता असलेली सीएनजी बस डिझाईन करण्यात आली आहे. या बसेस किमान 500 किमी धावतील असे त्यांचे डिझाईन तयार करण्यात असल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

बससेना एलएनजी इंजिन किट

एसटी महामंडळाने त्यांच्या ताब्यातील गाड्यांना एलएनजी इंजिन किट बसवण्याचे अलीकडेच निर्णय घेतला होता. एलएनजी म्हणजेच लिक्विफाइड नॅचरल गॅस या एलएनजीच्या किटसाठी अद्याप कोणताही कंत्राटदार पुढे आलेला नाही. एलएनजीवर अद्याप पर्यंत कोणीही बस चालवलेली नाही तंत्राबाबत शोधा शोध सुरू असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. अद्याप त्यासाठी कोणतेही कंपनी किंवा कंत्राटदार पुढे आलेला नसल्याची माहिती सूत्रानी दिली आहे.