ग्रँटरोड ते इर्स्टन फ्रीवेपर्यंत एलीवेटेड रोडचा प्रस्ताव

| Updated on: Jan 21, 2023 | 2:01 PM

मुंबईतील ग्रँटरोड परीसरातून दक्षिण मुंबईतील फ्रीवेला पोहचण्यासाठी एलीवेटेड मार्ग बाधण्याची योजना आहे. या योजनेमुळे सध्या लागणारा 30 ते 50 मिनिटांचा कालावधी अवघ्या पाच ते सात मिनिटांवर येणार आहे.

ग्रँटरोड ते इर्स्टन फ्रीवेपर्यंत एलीवेटेड रोडचा प्रस्ताव
FREEWAY
Image Credit source: FREEWAY
Follow us on

मुंबई : ग्रँटरोड ते इर्स्टन फ्रीवे हे अंतर कमी करण्याची योजना आहे. सध्या ग्रँटरोड ते इर्स्टन फ्रीवेला जाण्यासाठी तीस ते पन्नास मिनिटे लागतात. आता हेच अंतर पाच ते सात मिनिटे करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने येथे एलिवेटेड उन्नत मार्ग बांधण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे. या निर्णयामुळे दक्षिण मुंबईच्या उत्तर टोकाकडून इस्टर्न फ्रीवेला झटपट पोहचता येणार आहे. त्यामुळे ग्रँटरोड, मलबार हील आणि ताडदेव परीसराला नवीमुंबई विमानतळाशी कनेक्ट करता येणार आहे.

मुंबईतील ग्रँटरोड परीसरातून दक्षिण मुंबईतील फ्रीवेला पोहचण्यासाठी एलीवेटेड मार्ग बाधण्याची योजना आहे. या योजनेमुळे सध्या लागणार 30  ते 50 मिनिटांचा कालावधी अवघ्या पाच ते सात मिनिटांवर येणार आहे. न्हावाशेवा ते शिवडी ट्रान्सहार्बर हार्बर लिंकशी हा मार्ग कनेक्ट करण्याची योजना आहे. त्यामुळे ग्रँटरोड, मलबार हील आणि ताडदेव परीसराला नवीमुंबई विमानतळाशी कनेक्ट करता येणार आहे.

एमएमआरडीएने मरीनड्राईव्ह ते फ्रिवे बोगद्याने कनेक्ट करण्याची योजना आखली आहे. त्यानंतर बीएमएमसीने ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीने फ्रीवे ते मरीनड्राईंव्ह भुयारी टनेल बांधल्यावर आमचा उन्नत मार्ग साऊथ मुंबईतील इतर रहिवाशांच्या फायद्याचा ठरणार असल्याचे पालिकेचे अतिरीक्य आयुक्त पी.वेलारासू यांनी म्हटले आहे. या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि आर्थिक बाबींवर आपण क्लिअर केल्यावर हा प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी पालिका आयुक्तांकडे जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

ही योजना पालीका आयुक्तांकडून एकदा का मंजूर झाली की दहा दिवसांत टेंडर दहा दिवसात टेंडर काढतील असेही त्यांनी सांगितले. फ्रीवे ओरेंज गेटने मानखुर्दशी जोडला गेला आहे. तेथे देवनार आणि भक्तीमार्ग असे दोन फाटे आहेत. तो 2014 मध्ये बांधला होता. यामुळे दक्षिण मुंबईचे पूर्व उपनगराशी, तसेच नवीमुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि इतर भागाशी कनेक्शन झाले.

आता शिवडी ते न्हावासेवा मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे नवीमुंबई एअरपोर्ट आणि जेएनपीटीशी कनेक्ट केला जाणार आहे. त्यामुळे फ्रीवेचे ट्रॅफीक वाढले जाईल. त्यामुळे 5.5 किमीचा एलिवेटेड रोड हे ट्रॅफीक दूर करण्यास मदत करेल. त्यामुळे 30 ते 50 मिनिटांचे अंतर अवघ्या पाच ते सात मिनिटावर येईल असे त्यांनी स्पष्ट केले. हा नवा एलिवेटेड मार्ग फ्रीवेच्या ऑरेंज गेटपासून सुरु होऊन जे.राठोड रोड – हँकॉक ब्रिज – जे.जे.उड्डाण पुलाच्या वरून मौलाना शौकत अली रोड- फेरेरे ब्रिजच्या पूर्वेला संपेल.