मुंबईः मनी लाँडरिंग (Money Laundering) आणि डी कनेक्शनच्या (D-connection) आरोपाखाली अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध विशेष पीएमएलए न्यायालयात सुमारे 5000 पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या विरोधात आता आणखी डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे. नवाब मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, मात्र आता पुन्हा ईडीकडून पाच हजार पानांचं दस्ताऐवजासह आरोप पत्र दाखल केले गेल्याने आता मलिकांची चिंता वाढणार असून विरोधकांना आता आणखी एक मुद्दा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या संबंधित कुटुंबीयांच्या मालमत्तांवर कारवाईही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढही करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्याच्या समस्यांबाबत त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीही वाढवण्यात आली होती.
Mumbai | Enforcement Directorate submits around 5000-page chargesheet against NCP leader and Maharashtra minister Nawab Malik in Special PMLA court, in connection with a money laundering case pic.twitter.com/E1nFoqY5xf
— ANI (@ANI) April 21, 2022
आता पुन्हा नवाब मलिकांबाबत ईडीकडून पुन्हा 5 हजार पानांचं आरोप पत्र दाखल केले गेले असल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीच्या निर्णयात काय होणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. न्यायालयीन कोठडीत असणारे मलिक सध्या वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्या पायाला सूज येणे आणि किडनीचा त्रास होणे हा त्रासही त्यांना होत आहे मात्र त्यावर औषधोपचार केला जात असला तरी त्याच्यावर कायमस्वरुपी उपाय करण्याची मागणी करण्यात आली होती.
संबंधित बातम्या
Jitendra Awhad: भोंग्याचा विषय फक्त दंगल माजवण्यासाठी निर्माण झालाय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप