नाशिक : सगळीकडे सध्या अतिवृष्टी सुरु (Heavy Rain) आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी (Tourist Place) जास्त प्रमाणात लोकांची गर्दी होत असल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नाशिक पश्चिम विभागाच्या अधिनस्त त्र्यंबकेश्वर (Trimkeshwar) तालुक्यातील पहिने, दुगारवाडी, हरीहर, भास्करगड, अंजनेरी, वाघेरा, इगतपुरी तालुक्यातील भावली, त्रिंगलवाडी, कुरुंगवाडी आदी सर्व गडांवर आणि सर्व पर्यटन स्थळी आजपासून पुढील आदेश मिळेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आले आहेत. ह्या गडांवर किंवा पर्यटन स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न नागरीकांनी करु नये, अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा नाशिक पश्चिम भाग उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत नागरीकांनी नोंद घ्यावी. आणि आदेशाचे काटेकोरपणे पालन करुन नागरीकांनी वन विभागास सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. नाशिक शहर व सभोवतालच्या परिसरात काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून, नागरीकांना व पर्यटन प्रेमी यांना पर्यटन क्षेत्रास भेट देण्याचा मोह अनावर होणे साहजिकच आहे. परंतु नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या दिवसात अनेक जण गड किल्ले सर करायला जातात. अनेक जण ट्रेकिंगला जातात. अनेकजण धबधब्यात भिजायला जातात पावसाळा म्हणजे जणू पिकनिक जाम मौसमच असतो. त्यामुळे या दिवसातच मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत अनेक फिरायेच प्लॅन बनतात. मात्र होणारे अपघात या आनंदात विर्जन टाकण्याचे काम करतात, तेच टाळण्याचा प्रयत्न पर्यटन विभागाडून करण्यात येत आहे.
पावसाळा म्हटलं की हिरवेगार डोंगर, गडकिल्ले, धबधबे अशी ठिकाण अतिशय सुंदर बनलेले असतात. सहाजिकच या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक पावसाळ्यात दाखल होतात. आपल्या महाराष्ट्रात ही अशी अनेक पर्यटन स्थळ आहेत. ज्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात नाशिक जिल्ह्यातील पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात असतो. मात्र याच पावसाळ्यात पाऊस, चिखल यामुळे अपघातांचा धोका जास्त असतो. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळण्यासारख्या घटनाही घडत असतात. त्यामुळे आता पर्यटन विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आलेले आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी या आदेशाची पालन करणे आवश्यक आहे.