Mohan Bhagwat : प्रत्येक दाम्पत्याला किमान 3 मुलं हवीत; सरसंघचालकांच्या नवीन आवाहनाचा अर्थ काय?

| Updated on: Dec 01, 2024 | 3:18 PM

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याला महत्त्व असतं. आता सरसंघचालकांनी प्रत्येक दाम्पत्याला किमान 3 मुलं हवीत, असं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ तरी काय आहे?

Mohan Bhagwat : प्रत्येक दाम्पत्याला किमान 3 मुलं हवीत; सरसंघचालकांच्या नवीन आवाहनाचा अर्थ काय?
मोहन भागवत
Follow us on

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हटलं तर वावगं ठरू नये. संघाच्या सूक्ष्म नियोजनामुळे सत्ता खेचून आणण्यात महायुतीला यश आले. दरम्यान प्रत्येक दांपत्याला किमान 3 मुलं हवीत, असं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. सरसंघचालक नाहक कोणतेही वक्तव्य करत नाही. त्या बाष्कळ गप्पा नसतात. मग त्यांच्या या नवीन वक्तव्याचा अर्थ तरी काय आहे?

संस्कृती टिकली पाहिजे

कुलनीती चालली पाहिजे त्यातून संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढी कडे जाते. आपली संस्कृती टिकविली जाते. माणसाचा स्वभाव मिळविणारा असला पाहिजे. पण त्यासोबत वाटणाऱ्यांचा सुद्धा असला पाहिजे ,वाटणाऱ्यांचा मान मोठा असतो. माणसाचा स्वभाव असतो आणि समाजाची संस्कृती असते. महिलेच महत्व आपल्या संस्कृतीत मातेचं असतं, पाश्चात्य संस्कृतीत पत्नीच असते. धन माणसाजवळ असावं पण ते आवश्यकतेपेक्षा जास्त असून नये, असे सरसंघचालकांनी सांगीतले.

हे सुद्धा वाचा

आपल्याकडे मजबूत व्यवस्था

घरात लागलेलं वळण फार महत्त्वाचं असत कारण ते परंपरेने चालत आलेला असत. पाश्चात संस्कृतीमध्ये या गोष्टी वेगळ्या प्रकारे त्यांच्या कडे सुद्धा संस्कृती होती. पण त्यांनी आता त्याचा विसर पडला आहे. मात्र आपल्याकडे संस्कृती अजून जपली जात आहे. घरातील लहान लहान गोष्टीतून आपली संस्कृती जपली जाते ही व्यवस्था आपल्याकडे आहे. कुटुंबा पासून संस्कृती गाव आणि मग राज्यात जाते, असे सरसंघचालक म्हणाले.

किमान 3 मुलं असावीत

सध्या लोकसंख्यात कमाल घसरण होत आहे. हा चिंतेचा विषय आहे. आधुनिक लोकसंख्या शास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या 2.1 च्या खाली जाते. तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो. त्याला कोणी संपवण्याची गरज नसते. उलट एखादे संकट उद्भवल्यास तो समाज आपोआप नष्ट होतो. अशाच प्रकारे अनेक भाषा आणि समाज नष्ट झाल्या आहेत, असे भागवत यांनी स्पष्ट केले.

लोकसंख्या 2.1 पेक्षा कमी होता कामा नये. आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण 1998 वा 2002 मध्ये निश्चित करण्यात आले. त्यात हे स्पष्ट करण्यात आले आहे की, लोकसंख्या 2.1 पेक्षा कमी असता कामा नये. त्यामुळे आपण हा 2.1 चा वृद्धी दर ग्राह्य धरला तर आपल्याला दोन अथवा त्यापेक्षा अधिक मुलं हवी आहेत. त्यामुळे आपल्याला दोन पेक्षा जास्त म्हणजे तिघांची गरज आहे. हेच लोकसंख्या विज्ञान सांगते, अशी फोड मोहन भागवत यांनी केली.