मुंबईः सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनात मुंबईकरांना आता जास्त काळजी करावी लागणार आहे. उच्च रक्तदाब, वाढता शुगरचा त्रास, हृदयविकाराचेही सध्या रुग्ण वाढत असतानाचा मुंबईमध्ये एका सर्वेक्षणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 18 ते 69 वयोगटातील (18 to 69 age group) प्रत्येक तिसऱ्या मुंबई करायला उच्च रक्तदाब (High blood pressure) असल्याची बाब एका पाहणी द्वारे पुढे आले आहे मुंबईकरांच्या (citizen of Mumbai) आहारात असलेले मीठ त्याला कारणीभूत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार प्रत्येकाच्या आहारात पाच ग्रॅमपेक्षा अधिक मीठ नसावे पण मुंबईकर दररोज 8.9 ग्रॅम मीठाचे सेवन करतात असा निष्कर्ष मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढला आहे.
या सर्वेक्षण अंतर्गत 5000 मुंबईकरांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये 34 टक्के मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे आढळले आहे. हे सर्वजण प्रमाणापेक्षा अधिक मीठ आहाराद्वारे घेत असल्याचेही सांगण्यात आले.
नोव्हेंबर 2021 ते जून 2022 या दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले होते अशी माहिती मुंबई पालिकेच्या आरोग्य आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली. उच्च रक्तदाबामुळे हृदय आणि मेंदू यांच्यावर परिणाम होऊन अनेक जण दगावल्याचेही आढळून आले असल्याचेही सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने ही पाहणे हाती घेतली होती, घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. यामध्ये झोपडपट्टी विभागातील काही नागरिकांचाही समावेश करण्यात आला होता, त्याचबरोबर महापालिकेच्या काही रुग्णालयांमधून अशा प्रकारची तपासणी करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
तपासणी केल्यानंतर उच्च रक्तदाब आढळलेल्या व्यक्तींना पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार देण्यात आले होते. त्यांच्या आहारामध्ये काय बदल करावेत किती प्रमाणात मीठ आहारात असावे याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले होते.
पुढील आठ ते नऊ महिन्यांमध्ये शहरातील 30 वर्षावरील नागरिकांची रक्तदाब तपासणी करण्यात येणार असून महापालिकेच्या रुग्णालयात केलेल्या एका वेगळ्या पाहणीमध्ये ज्यांना उच्च रक्तदाब आणि मधूनही आहे असे 12 हजार रुग्णांना आहार तज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
शरीरातील धमण्यामधून होणारे रक्ताभिसरण अधिक वेगाने झाल्यास ते उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते अशी माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली असून वाढता उच्च रक्तदाब हे शरीरासाठी घातक असल्याचेही आरोग्याधिकारी सांगितले.
140/90 या दाबापेक्षा अधिक असलेला रक्तदाबा उच्च रक्तदाब मानला जातो. यामध्ये अनेक मुंबईकर असल्यानेच त्यांना आहाराविषयी आणि आरोग्याविषयी काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले आहे.
मुंबईतील धक्काधक्कीच्या जीवनमानामुळे उच्च रक्कदाबाचा त्रास होत असून मुंबईतील झालेल्या सर्वेक्षणानुसार 34 टक्क्यांपेक्षा अधिक मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचेही सांगण्यात आले आहे.