मुंबई : विक्रोळी येथे कोरोनाची लागण झालेल्या माजी नगरसेविकेचा आज (5 मे) कोरोनामुळे मृत्यू झाला (Ex Corporator death due to Corona Mumbai) आहे. या घटनेने विभागात एकच खळबळ उडाली आहे. या माजी नगरसेविकेला कॅन्सरही होता. या आजाराच्या उपचारावेळी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. विक्रोळी टागोर नगर येथून त्या दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून (Ex Corporator death due to Corona Mumbai) आल्या होत्या.
विक्रोळीतील माजी नगरसेविकेला विशेष कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
या माजी नगरसेविकेला कॅन्सरही झाला होता. गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. यादरम्यान नुकतंच त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माजी नगरसेविका या दोन टर्म टागोर नगर येथे नगरसेविका होत्या. अत्यंत लोकप्रिय गरजवंताना मदत करणाऱ्या नगरसेविका म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने विभागात शोककळा पसरली आहे.
नुकतेच नागपूरमध्ये एका कॅन्सर रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. पण या रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. या रुग्णाला बरा झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत 14 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 583 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 2465 रुग्ण कोरोनामुक्त झालेले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
Corona : मुंबईत कोरोना मृत्यूदर जवळपास निम्म्याने घटला
मुंबईत कोरोनामुळे आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू, 3 दिवसात 3 पोलिसांच्या मृत्यूने खळबळ