मुंबई | 4 जानेवारी 2024 : शिवडी-न्हावाशेवा लिंकमुळे आता मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर आता अजून कमी होणार आहे. न्हावा-शेवा सागरी सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी पूल आहे. या सागरी सेतूमुळे इंधनाची आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. वाहनधारकांचा मोठा फेरा वाचणार आहे. त्यासाठी त्यांना खिसा मात्र खाली करावा लागेल. त्यांना या पुलावरुन वाहतुकीसाठी सहाजिकच टोल द्यावा लागणार आहे. हा टोल 250 रुपये इतका आहे. राज्य मंत्रिमंडळाने याविषयीचा निर्णय घेतला आहे. इतरही अनेक महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले आहे.
500 नाही तर 250 रुपयांचा टोल
अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला आहे. हा सागरी सेती 22 किलोमीटरचा आहे. ज्या प्रवासासाठी पूर्वी 7 लिटर इंधन लागणार होते, तिथे एक लिटर इंधन लागणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. या सेतूसाठी कर्ज घेतले आहे. केंद्र सरकाचे निकष लावता या सेतूवरील प्रवासाठी 500 रुपयांचा टोल लागणार होता, पण राज्य सरकराने तो 250 रुपये केल्याचा दावा त्यांनी केला.
लवकरच जनतेच्या सेवेत
शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचे लवकरच लोकार्पण होण्याची शक्यता आहे. 12 जानेवारी 2024 रोजी त्यासाठी मुहूर्त लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांना यासाठी विनंती करण्यात आल्याचे समोर येत आहे. उद्धघाटनानंतर हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला होईल.
मंत्रिमंडळाचे इतर महत्वाचे निर्णय