बोम्मई यांच्यावर खटला दाखल करून दाखवा, खासदार संजय राऊत यांचे आव्हान, सीमावादावर शिंदे-फडणवीस गप्प का?

| Updated on: Dec 23, 2022 | 5:17 PM

उद्या पाकिस्तानात राहून दाऊत इब्राहीम यांनी भाजपात प्रवेश केला, तर त्यांनाही क्लीनचीट मिळेल, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

बोम्मई यांच्यावर खटला दाखल करून दाखवा, खासदार संजय राऊत यांचे आव्हान, सीमावादावर शिंदे-फडणवीस गप्प का?
खासदार संजय राऊत
Follow us on

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर महाराष्ट्रात खटला दाखल करून दाखवा, असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिलं. केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांचे आदेश धुळकावून बोम्मई सीमावाद पेटवत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारला शेपटी घालून बसावं लागतं, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. बोम्मईंनाच काय दाऊद इब्राहिमलाही क्लीन चीट देतील, असंही संजय राऊत म्हणाले. ते आमच्यावर खटले दाखल करू इच्छितात. माझ्यावर आणि जयंत पाटील यांच्यावर. माझं सरकारला आव्हान आहे. तुम्ही जर मराठी मातीचे इमानदार पाईक असालं, तर बोम्मईवरती खटला दाखल करा. त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले आहेत, असंही ते त्यांनी सांगितलं.

तुम्ही याची एसआयटी लावता. त्याची एसआयटी लावता. त्याची चौकशी करता. त्याला क्लीनचीट देतात. उद्या तुम्ही बोम्मईंनाही क्लीनचीट द्याल. आमची इच्छा सर्वकाही करण्याची आहे. पण, सरकारमध्ये हिंमत आहे का. आमची भाषा घुसण्याची आहे. ती भाषा आम्ही केली आहे.

या सरकारला शेपट्या फुटल्या आहेत. रोज एक शेपटी आतमध्ये घालतात. २० लाख मराठी बांधव अन्यायग्रस्त आहेत. निदान त्यांच्या बाबतीत तरी महाराष्ट्राशी इमान राखा, असं संजय राऊत म्हणाले.

राज्य सरकारनं क्लीनचीटचा कारखाना उघडला आहे. कुणा-कुणाला मिळाली मला माहीत नाही. उद्या बोम्मई यांनाही क्लीनचीट मिळेल. उद्या पाकिस्तानात राहून दाऊत इब्राहीम यांनी भाजपात प्रवेश केला, तर त्यांनाही क्लीनचीट मिळेल, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

विरोधकांना गुन्हेगार ठरविलं जाऊ शकतं. हा क्लीनचीटचा कारखाना आणि दिलासा घोटाळा आहे. या सुत्रीवर हे राज्य चाललंय, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.