मुंबईः कोरोनाच्या पार्श्वभूमवीर यंदाच्या गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवदेखील अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात महापालिकेनं नियमावली जारी केलीय. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे, त्यासाठी ऑनलाईन परवानगी यंत्रणा तयार करून ती 23 तारखेपासून कार्यान्वितही केलीय. यंदा कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर परवानगी विनाशुल्क देण्यात येणार आहे.
? कोरोना साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता घरगुती तसेच सार्वजनिकरीत्या स्थापन करण्यात येणाऱ्या देवमूर्तींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
? देवींची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट आणि घरगुती मूर्तींकरिता 2 फुटांपेक्षा जास्त उंचीची नसावी.
? पारंपरिक देवीमूर्तीऐवजी शाडूची मूर्ती असल्यास विसर्जन घराच्या घरीच करावे, जेणेकरून आगमन/विसर्जनाची गर्दी टाळता येऊ शकते.
? देवीच्या आगमनासाठी 5 व्यक्तींचा समूह असावा. जे कोविड नियमांचे काटेकोर पालन करतील. तसेच शक्यतो त्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेऊन 15 दिवस झालेले असावेत.
? सार्वजनिक देवीमूर्तींच्या आगमनाच्यावेळी आणि विसर्जनाच्या वेळी 10 पेक्षा जास्त लोक नकोत.
? नवरात्रोत्सवादरम्यान गरब्याचे आयोजन नको, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमातही गरदी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
? शक्यतो देवीमूर्तींच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन किंवा फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून दिलेली असावी.
?तसेच देवी मंडपांमध्ये थर्मल स्क्रीनिंगची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक राहील.
?मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण केलेले असावी.
?नवरात्रोत्सव 2021 साजरा करताना आरोग्य विषयक आणि सामाजिक संदे असलेल्या जाहिरातींना पसंती देण्यात यावी
?शक्यतो व्यावसायिक जाहिराती करू नयेत.
?कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे, फुले, हार अर्पण करणे टाळणे आवश्यक आहे.
?कोरोना विषाणूची गंभीर आपत्ती लक्षात घेता गर्दी टाळावी, गरब्याचे आयोजन करू नये.
?मंडळातर्फे रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी आयोजित करावेत.
?मंडपात एका वेळी पाच पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये. तसेच मंडपात मास्क घालणे बंधनकारक असेल. सामाजिक अंतर राखून नियमांचं काटेकोट पालन करावे लागेल.
?देवीच्या आरतीच्या वेळी मंडपात दहापेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित नसावेत. मास्क आणि कोविड नियमाचे काटेकोर पालन केलेले असावे.
?देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाचा कार्यक्रम कमीत कमी लोकांमध्ये पार पाडणे आवश्यक आहे. लहान मुले आणि वरिष्ठांनी सुरक्षेच्या कारणास्तव विसर्जनस्थळी जाणे टाळावे.
?सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन धिम्या गतीनं नेऊ नये. तसेच विसर्जनादरम्यान वाहन थांबवून रस्त्यांवर भाविकांना देवीमूर्तीचे दर्शन घेऊ देण्यास सक्त मनाई आहे.
?नैसर्गिक विसर्जनस्थळी देवीमूर्तींचे विसर्जन करताना नागरिकांना थेट विसर्जन करता येणार नाही. नागरिकांना मूर्ती जमा कराव्या लागतील. त्यानंतर पालिकेमार्फत त्यांचं विसर्जन होईल.
?नैसर्गिक विसर्जन स्थळी प्रकाश योजना, जनरेटरची व्यवस्था केलेली असावी.
?शासनाने दिलेल्या कोविड नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
?ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.
संबंधित बातम्या
नवी मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला, मोरबे धरण 100 टक्के भरले!
सणासुदीच्या तोंडावर तेलाचे दर 5 ते 10 रुपयांनी वाढले; ग्राहक चिंताग्रस्त