मुंबई: अंधेरी पूर्वेकडील कामगार हॉस्पिटलमध्ये (एसआयसी) दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली. या रुग्णालयाची इमारत काचेची असून बहुमजली आहे. त्यामुळे आगीतून रुग्णांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. खिडकीतून दोरखंडाच्या सहाय्याने रुग्णांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. आगीच्या धुराने रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे जवानांनी इमारतीच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. आग लागल्याचं समजताच काही रुग्णांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरुन उड्या मारल्याचंही सांगण्यात येत आहे. वरुन उडी मारल्याने एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य एकजणही या आगीचा बळी ठरला. आतापर्यंत यात सहा जणांचा मृत्यू झाला तर 108 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.
दुपारी साडेचारच्या सुमारास लागलेली आग संध्याकाली सातच्या सुमारास नियंत्रणात आल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.
सध्या फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. अग्निशमन दलाचे जवान शिडीवर चढून वरच्या मजल्यांवरुन रग्णांना बाहेर काढत आहेत. रुग्णांना नेमकं बाहेर कसं काढायचा हा प्रश्न जवानांसमोर आहे. मात्र मिळेल ती जागा पकडून जवान शिडी, दोरखंड लावून रुग्णांना बाहेर काढत आहेत. रुग्ण आणि रुग्णालय स्टाफ मिळून दीड-दोनशे जण रुग्णलायात अडकल्याची शक्यता आहे.
दुपारी चारच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. कामगार रुग्णालयाच्या शेवटच्या मजल्यावर आग लागून ती खालच्या मजल्यापर्यंत पसरत गेल्याचं सांगण्यात आलं. सुरुवातील आग नेमकी कुठे लागली हेच कळालं नाही, त्यामुळे सगळीकडे धावाधाव सुरु झाली. यानंतर आगीचे लोट सर्वत्र पसरु लागले. आगीच्या धुराने रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊनही रुग्णालयात जात आहेत.
या घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला, तर जवानांनी शिड्या आणि दोरखंडाने रुग्णांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. जवळपास 28 जखमींना रुग्णालयातून बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. सेव्हन हिल्स, कूपर, ट्रॉमा अशा विविध रुग्णालयांमध्ये या रुग्णांना हलवण्यात आलं.
स्थानिकांनी जवळपास शंभर साड्या आणून साड्यांना गाठ बांधून मोठी साखळी तयार करुन रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
अंधेरीतील कामगार हॉस्पिटलला भीषण आग #AndheriFire Kamagar Hospital pic.twitter.com/WGyEFWNYcF
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2018
अंधेरीतील कामगार हॉस्पिटलला भीषण आग, दोरखंडाने रुग्णांना बाहेर काढण्याचे प्रयत्नhttps://t.co/hqxMp0OGkO ्
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2018