मुंबई : घाटकोपर येथे कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. मात्र या गोदामातून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. या आगीचा एक व्हिडीओ सध्या समोर आला असून त्यावर या घटनेच्या भीषणतेचा अंदाज लावला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपर परिसरात एक कपड्यांचा गोदाम आहे. याच गोदामाला आज सकाळी अचानकपणे आग लागली आहे. कपड्यांचा गोदाम असल्यामुळे त्याला काही क्षणात आग लागली. ही आग आता मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आग नेमकी का लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आकाशातील धुराचे लोट पाहून गोदामाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी अग्निशमन दलाला तत्काळ कळवले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या गाड्यांकडून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे
#WATCH | Fire breaks out a godown in Ghatkopar area of Mumbai; eight fire engines rushed to the spot pic.twitter.com/tij8fX23sZ
— ANI (@ANI) January 3, 2022
इतर बातम्या :
Mahadev Jankar | महादेव जानकरांनी दंड थोपटले, आगामी लोकसभा निवडणूक परभणीतून लढवणार