मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांचं एसी लोकलने (AC Local) प्रवास करण्याचं स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरलं आहे. कुर्ल्याहून पहिली एसी लोकल (Mumbai Local Train Update) आज (17 डिसेंबर) पहाटे 5.42 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना झाली. रेल्वे बोर्डाने सीएसएमटी आणि कल्याण स्थानकादरम्यान 10 एसी लोकल चालवण्यास मान्यता दिली. मध्य रेल्वेवर पहिल्यांदाच एसी लोकल धावत आहे. (First AC local on Central Railway runs between Kurla Chhatrapati Shivaji Maharaj Terminus CSMT)
पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही आता गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आजपासून एसी लोकलची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी एसी लोकलचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेवर पहिली एसी लोकल कुर्ला आणि सीएसएमटीदरम्यान पहाटे 5.42 वाजता धावेल. तर सीएसएमटी आणि कुर्ल्यादरम्यान शेवटची लोकल रात्री 11 वाजून 53 मिनिटांनी सुटेल.
एसी लोकल सेवा सोमवार ते शनिवार सुरु राहील. या लोकल सर्वच स्थानकांवर थांबणार आहेत. रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारद्वारे परवानगी दिलेल्या व्यक्तींनाच सध्या लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. एसी लोकल उन्हाळ्यात दिलासादायक ठरतील, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मुख्य मार्गावर या 10 वातानुकूलित उपनगरी सेवा सुरु करण्यात येणार आहेत. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्य स्थानी कोविड 19 संबंधित सर्व निकषांचे पालन करणं बंधनकारक असेल.
Maharashtra: AC local services on Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT)-Kalyan section begins from today.
A local says,” It’s a good step and will be a relief for us in summer.”
Central Railway has decided to run 10 AC local services on the section from today. pic.twitter.com/UWQZoHLJRn
— ANI (@ANI) December 17, 2020
कोरोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा बंद आहे. जुलै महिन्यापासून शासनाने मान्यता दिलेल्या प्रवाशांनाच लोकल वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर सरसकट महिलावर्गाला लोकलने प्रवास करता येतो.
संबंधित बातम्या
(First AC local on Central Railway runs between Kurla Chhatrapati Shivaji Maharaj Terminus CSMT)