मुंबई : डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉरच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. वाणगांव आणि डहाणू स्थानकांदरम्यान अप तसेच डाउन लाइनवर 8, 9, 11 आणि 12 जानेवारीला स.09.45 वाजल्यापासून 10.45 वाजेपर्यंत तर 13 जानेवारीला स. 10.20 वाजल्यापासून स.11.20 वाजेपर्यंत पॉवर सह ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या पुढील ट्रेनवर परीणाम होणार आहे.
या गाड्यांवर परिणाम
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानूसार पश्चिम रेल्वेच्या या गाड्यांवर परिणाम होणार आहे.
1) ट्रेन क्र. 12934 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्सप्रेसला 8, 9, 11 तसेच 12 जानेवारी रोजी डहाणू रोड स्टेशनवर 35 मिनटे थांबिवले जाणार आहे.
2) 8, 9, 11 तसेच 12 जानेवारीला अंधेरीहून स. 07.51 वाजता सुटणारी अंधेरी-डहाणू रोड लोकलला वाणगांव स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट केले जात तिचा प्रवास संपविला जाणार आहे. परतीच्या दिशेला तिला डहाणू रोड ऐवजी वाणगांव ते चर्चगेट असे चालविले जाणार आहे. या दोन्ही ट्रेन वाणगांव आणि डहाणू रोड दरम्यान रद्द राहतील.
3) 8, 9, 11, 12 आणि 13 जानेवारीला चर्चगेटहून स. 07.42 वा.सुटणारी चर्चगेट-डहाणू रोड लोकल वाणगांव स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. परतीच्या दिशेला डहाणू रोड एवजी ही लोकल वाणगांव ते विरार चालविली जाईल. या दोन ट्रेन वाणगांव आणि डहाणू दरम्यान रद्द केल्या जातील.
4) ट्रेन क्र. 20483 भगत की कोठी-दादर सुपरफास्ट एक्सप्रेसला 13 जानेवारीला डहाणू रोड स्टेशनवर 40 मिनटे थांबवले जाईल.
5) 13 जानेवारीला चर्चगेटहून स. 08.49 वाजता सुटणाऱ्या चर्चगेट-डहाणू रोड लोकलला वाणगांव स्टेशन वर 20 मिनटे थांबविले जाईल.