एकही प्रवासी थेट घरी सोडणार नाही, सक्तीने क्वारंटाईन करणार, BMC आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये

| Updated on: Dec 21, 2020 | 7:07 PM

ब्रिटन (UK) आणि आखाती देशांतून (Middle East countries) मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी केली जाईल. | Mumbai airport

एकही प्रवासी थेट घरी सोडणार नाही, सक्तीने क्वारंटाईन करणार, BMC आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये
Iqbal singh Chahal
Follow us on

मुंबई: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (Coronavirus new strain) आढळल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ब्रिटन (UK) आणि आखाती देशांतून (Middle East countries) मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी केली जाईल. तसेच या प्रवाशांना 14 दिवसांसाठी हॉटेल्स आणि इतर ठिकाणी क्वारंटाईन होणे सक्तीचे असेल. तर इतर देशांतून येणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. (Flight passengers from UK and Middle east countries will be quarantine for 14 days)

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी रात्रीपासून ते 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी (Night Crufew) लागू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर इकबाल सिंह चहल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युनायटेड किंग्डम आणि आखाती देशांमधून मुंबईत येणाऱ्या विमान प्रवाशांसाठीच्या नियमांची माहिती दिली. ब्रिटनमधून भारतात येणारी हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज सकाळीच घेतला होता.

मात्र, सध्या प्रवासात असलेली पाच विमाने मंगळवारी रात्रीपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. यापैकी दोन विमाने आज रात्री, दोन विमाने उद्या सकाळी दहा वाजता तर एक विमान हे रात्री 11 वाजण्यापूर्वी मुंबईत दाखल होईल. या विमानांमध्ये 1000 प्रवाशी आहेत. या सर्वांची विमानतळावर तपासणी केली जाईल. कोरोनाची लक्षणे असलेल्या प्रवाशांना थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवले जाईल. तर उर्वरित प्रवाशांनाही हॉटेल्स किंवा इतर ठिकाणी 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाईल, अशी माहिती इकबालसिंह चहल यांनी दिली.

परदेशातून येणाऱ्या लोकांबाबात विशेष काळजी

परदेशातून येणाऱ्या लोकांसोबत काम करणारे सर्व कर्मचारी हे पीपीई किट घालूनच काम करतील. पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊ नये. आवश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.

‘यंदाचे नववर्ष नॉर्मल नाही, सेलिब्रेशनला मर्यादा’

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू असल्यामुळे रात्री ११ पर्यंत नियमात कोणताही बदल नाही. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत महापालिका क्षेत्रात निर्बंध असतील. हे वर्ष नॅार्मल नाही. त्यामुळे 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर नियंत्रण ठेवाव लागेल, असे इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या:

केईएम, शीव, कूपर, नायरसह 8 ठिकाणी लसीकरण केंद्रे; वाचा मुंबईत कुठे, कसे होणार लसीकरण!

कोरोनाचा कहर: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द; केंद्राचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

(Flight passengers from UK and Middle east countries will be quarantine for 14 days)