निनाद करमरकर, Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केला. दीपक केसरकर म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल होतेय. 40 लोकांमुळं चिन्ह गोठवलं म्हणतात. त्याचं 40 लोकांमुळे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले, हे उद्धव ठाकरे कसं विसरतात. आमची बदनामी थांबली पाहिजे. वर्षाच्या बाहेर उभं राहून दहा वेळा फोन केले की आत येऊ का तरी भेटत नव्हते.
केसरकर म्हणाले, आम्ही त्यांना काँग्रेससोबत राहू नका असं सांगितलं होतं. हिंदुत्त्वच्या विचारासोबत आहेत का? अजूनही त्यांच्याच सोबत आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावं. 40 लोकांच्या मतदारसंघात अडीच वर्षात अजिबात काम झाली नाहीत, असंही आहे.
कामं ही जनतेची असतात खासदार, आमदारांची नसतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्या आमदारांना संपवायला निघाले. त्यामुळे पक्षही संपला असता. आम्ही वारंवार सांगितलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी नको. मूळ मित्रांसोबत जाऊ, असं केसरकर यांनी सांगितलं.
हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांचा होता. पण उद्धव ठाकरे त्यापासून दूर जायला लागले. भाजपला नावं ठेवली गेली. मग त्यांच्यासोबत सरकार बनवायला का तयार झाले होते.
फक्त मुख्यमंत्री पद देतील की नाही याची शाश्वती नसल्यामुळे त्यांच्याशी सरकार केलं नाही. त्यांचे कॉल उचलले नाहीत. बोलले नाहीत. आमदार सांगायला आले की भाजपसोबत जाऊ, आघाडी तोडू. 20 आमदार सोडून गेल्यावर उरलेले २० आमदार भेटायला आले होते. तेव्हा यांनी काय उत्तर दिलं?, असा सवालही केसरकर यांनी विचारला.
तुम्हीही जायचं असेल तर जा असं उत्तर दिलं होतं. जनतेची कामं होत नव्हती म्हणून झालेला उठाव आहे. हा उठाव थांबवू शकत होते. पण तुम्हाला अंदाज आला नाही.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा आश्वासन दिलं होतं की नाही? बाळासाहेबांनी आश्वासन दिलं असतं तर ते पाळलं असतं. तरीही एकनाथ शिंदे सोडून गेले नाहीत सोबत राहिले. ज्यांनी आग्रह केला त्यांच्या आग्रहाला बळी का पडले?
अजूनही सांगा की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला म्हणायला लावा की आम्ही हिंदुत्ववादी आहोत. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी कशाची पर्वा केली नाही. मराठी माणसासाठी काय केलं अडीच वर्षात?, असा प्रश्न केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
अडीच वर्षात वीज देऊ शकले नाही. आम्ही मोफत वीज दिली. पेट्रोलचे दर आम्ही कमी केले. तुम्ही भाजपसोबत जायला का तयार होते? तुम्ही मुख्यमंत्री असालं तर भाजप चालेल अन्यथा चालणार नाही?
युतीची किंमत बाळासाहेब ठाकरे अटलबिहारी यांनी माहीत होती, ते नसताना युती का तोडली? एका तरी प्रश्नाचं खरं उत्तर द्या. भाजप सोबत जाणार होते की नाही तर सांगा. महाराष्ट्र ठाकरे फॅमिलीच्या बापाचा आहे का, असं विचारणारी व्यक्ती चालते का स्टेजवर? हिंदुत्वासोबत राहा इतकंच सांगितलं.
काँग्रेस राष्ट्रवादी नको हे शिंदे साहेबांनी सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, आम्हाला मुख्यमंत्री पद देतील का? हे खरं की खोटं?
आम्ही सहज मर्ज झालो असतो भाजपात. पण आम्ही शिवसैनिक आहोत म्हणून मर्ज झालो नाही. आम्ही शिवसेना जिवंत ठेवली. अन्यथा राष्ट्रवादीने शिवसेना संपवली असती.
मी आसामला असताना बोललो की औरंगाबाद, उस्मानाबाद नाव का बदललं नाही? मेजारीटी गेल्यावर घाईघाईने ही नावं बदलली.
आम्ही मात्र हे आसाममधूनच घोषित केलं होतं. आम्ही बोलतो तसं करतो. पण आम्ही कुणाला वाईट बोलत नाही, असंही केसरकर यांनी सांगितलं.