“मराठी भाषा जगवायची असेल तर फक्त दुकानांच्या पाट्या मराठीत लिहून होणार नाही”; ‘या’ नेत्याने मातृभाषेविषयी केली चिंता व्यक्त

| Updated on: Jan 04, 2023 | 4:21 PM

शिक्षणातून मराठी भाषा वाचवली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले. मराठी माध्यमामधून फक्त गरीब आणि सामान्य लोकांची मुलं न शिकता. मराठी माध्यमामधून शिक्षण घेतले गेले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठी भाषा जगवायची असेल तर फक्त दुकानांच्या पाट्या मराठीत लिहून होणार नाही; या नेत्याने मातृभाषेविषयी केली चिंता व्यक्त
Follow us on

मुंबईः मराठी मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काँग्रेसच्या काळात दिल्लीमध्ये मोठे प्रयत्न झाले होते. मात्र आताच्या सरकारमध्ये स्थैर्य नसल्याने मराठी भाषेविषयी शिंदे फडणवीस सरकार गंभीर नसल्याची टीका काँग्रेसचे माजी खासदार हुसैन दलवाई यांनी केली. यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी गरीबांची मुलं फक्त मराठी शाळेत आणि श्रीमंताची मुलं इंग्लिश मीडियमध्ये हे चित्र बदलले पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी त्यांनी सांगितले की आमचा इंग्रजी शाळांना विरोध नाही तर इंग्रजी बरोबरच मराठी माध्यमांमधून शिक्षण झाले पाहिजे असाही आग्रह धरला पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

काँग्रेसचे माजी खासदार हुसैन दलवाई यांनी सांगितले की, मराठी भाषा टिकवायची असेल, मराठी भाषेला जगवायचे असेल तर फक्त दुकानावरील पाट्या मराठी करून चालणार नाही.

तर त्यासाठी शिक्षणातून मराठी भाषा वाचवली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले. मराठी माध्यमामधून फक्त गरीब आणि सामान्य लोकांची मुलं न शिकता. मराठी माध्यमामधून शिक्षण घेतले गेले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठी भाषेला अभिजातपणाचा दर्जा द्यायचा असेल किंवा तो मिळवायचा असेल तर राज्य सरकारचीही मोठी जबाबदारी असल्याची टीका हुसैन दलवाई यांनी केली.

यावेळी त्यांनी शिक्षणाविषयी नाराजी व्यक्त करत मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शाळांविषयीही त्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, मराठी भाषा जगवायची असेल ती टिकवायची असेल तर दुकानांच्या पाट्या मराठी करून चालणार नाही तर शिक्षणापासून तो बदल केला पाहिजे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.