औरंगाबादः शिवसेना आणि ठाकरे गटाच्या न्यायालयीन वाद सुरू झाल्यापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर दुसरीकडे मात्र सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी अजून बाकी असताना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मात्र शिवसेना आणि पक्षाचे चिन्हही आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या छातीवर नेहमीच शिवसेनेचा धनुष्यबाण लावलेला असतो. मात्र ज्या वेळेपासून शिवसेनेचा न्यायालयीन लढाई सुरु झाली आहे. त्यावेळेपासून आपण हा धनुष्यबाण देवऱ्यामध्ये ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र आज जरी आपल्या छातीवर धनुष्यबाण नसला तरी हा रामचा आणि अर्जुनचा तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा हा धनुष्यबाण आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आणि व कोणत्याही प्रकारची स्थगिती दिली नसली तरी 3 आठवडे काहीही हालचाल करायची नाही असंही यावेळी सांगण्यात आले आहे.
ही सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून सुनावणी बाकी असून ज्याप्रमाणे शिवसेना गटाची बाजू मांडायची आहे त्याचप्रमाणे ठाकरे गटाचीही भूमिका अजून पुर्णपणे मांडायची बाकी असल्याचेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिवसेना गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने या निर्णयाला चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तर निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला मात्र माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो चुकीचाच आहे मात्र त्याबाबत अजून सर्वोच्च न्यायालयाचीही सुनावणी बाकी आहे.
त्यामुळे ज्या पक्षाला शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष मिळाले आहे तो पक्ष मात्र शिवसेना भवन, बँक अकाऊंट हे कोणीही ताब्यात घेऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने अजून स्पष्टपणे कोणताही निर्णय देण्यात आला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाची शिवसेना ही होऊ शकत नाही, असा विश्वासही चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, एकनाथ शिंदे यांच्या गटातील कोणत्याही नेत्याच्या प्रतिक्रियेवर मला बोलायचे नाही म्हणत त्यांनी गद्दार हा शब्द पुन्हा उच्चारत एकनाथ शिंदे यांच्यासह असलेल्या सर्व आमदारांना त्यांनी गद्दार असेच संबोधले आहे.