महाराजांबद्दल ठराविक पक्ष, ठराविक लोकांकडून अशी विधानं, या नेत्यांनी व्यक्त केली चिंता

| Updated on: Nov 20, 2022 | 6:22 PM

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ठराविक पक्ष किंवा ठराविक लोकांकडूनच अशी विधानं केली जात आहेत.

महाराजांबद्दल ठराविक पक्ष, ठराविक लोकांकडून अशी विधानं, या नेत्यांनी व्यक्त केली चिंता
Follow us on

परभणीः राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणासह सामाजिक वातावरणही ढवळून निघालं. या प्रकरणावर माजी खासदार संभाजीराजे यांनी परखड भूमिका घेत कोणीही उठ सूट महाराजांची तुलना कोणासोबत करू नये असा इशाराच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. तुम्ही या सगळ्यात महाराजांना कशाला ओढताय, महाराजांनी कधीही असं केलं नाही असंही त्यांनी सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनाही एक प्रकारचा इशाराच देण्यात आला आहे.

सुधांशु त्रिवेदी यांनी असं औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्रव्यवहाराबद्दल जे वक्तव्य केले आहे ते दुर्दैवी असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

राज्यपालांनी महाराजांसह अनेक थोर पुरुषांबद्दल यापूर्वीही असे वादग्रस्त विधाने केलेली आहेत. त्यामुळे मी कालच पंतप्रधानांनी राज्यपालांना राज्यातून काढून टाकावं अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ठराविक पक्ष किंवा ठराविक लोकांकडूनच अशी विधानं केली जात आहेत. त्यामुळे मी चिंतेत असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

हर हर महादेव या चित्रपटावरुनही काही दिवसापूर्वी वाद झाला होता. त्याविषयही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे त्यांनी आता स्पष्टपणे सांगितले की, त्या चित्रपटाच्या वेळीही मी हे परखड मत व्यक्त केलेले आहे. महाराजांचं आयुष्य सर्वांसमोर आहे, त्यामुळे कोणीही उठसूट स्टेटमेंट करुन करू नये असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या महाराष्ट्रात जे काही चालले आहे ते न पटणारं आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते सत्तेत आलेले आहेत. त्यामुळे कठोर कायद्याद्वारे याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे असं त्यांनी भाजपला सुनावण्यात आले आहे. या बरोबरच त्यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी द्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.