ठाणे, मुंबईमध्ये प्रशासकीय पातळीवर मोठे बदल, ‘या’ महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

| Updated on: Feb 15, 2021 | 7:04 PM

ज्य सरकारने ठाणे येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सरकारच्या वव्या आदेशानुसार आयपीएस कैसर खालिद (Kaiser Khalid) यांची लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे, मुंबईमध्ये प्रशासकीय पातळीवर मोठे बदल, या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
Follow us on

ठाणे : राज्य सरकारने ठाणे येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सरकारच्या नव्या आदेशानुसार आयपीएस कैसर खालिद (Kaiser Khalid) यांची लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयपीएस संजय शिंत्रे (Sanjay Shintre) यांच्याकडे मुंबई सायबर पोलीस विभागाच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे देण्यात आली आहेत. यापूर्वी राज्य सरकारने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या होत्या. (Four IAS officers transferred in Mumbai and Thane different department)

राज्य सरकारने ठाणे तसेच मुंबई प्रशानात मोठे फेरबदल केले आहेत. आपल्या नव्या जिआरनुसार राज्य सरकारने लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणून आयपीएस कैसर खालिद यांची नियुक्ती केली आहे. तर मुंबई सायबरचे पोलीस अधीक्षक म्हणून आयपीएस संजय शिंत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस महेश पाटील यांची मीरा भाईंदर, वसई विरार विभागाचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर आयपीएस रवींद्र सेनगावकर यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. आयपीएस पंजाबराव उगले ठाणे एसीबीचे नवे पोलीस अधीक्षक असतील.

सरकारने या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्यानंतर मुंबई आणि ठाणे प्रशासन तसेच पोलीस विभागात मोठे बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. बदली करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची कार्यशैली वेगळी असून त्याची मदत ठाणे, मीरा भाईंदर आणि मुंबई या भागाचा चेहरामोहरा बदलण्यास होणार, असे बोलले जात आहे.

पुण्यात श्रवण हर्डीकर यांची बदली

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी असलेले श्रवण हर्डीकर यांची 13 फेब्रुवारी रोजी बदली करण्यात आली. त्यांची बदली पुण्यातील नोंदणी महानिरीक्षकपदी करण्यात आली. हर्डीकर यांच्या जागी राजेश पाटील यांची महापालिकाचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

इतर बातम्या :

पिंपरी चिंचवडचे कर्तव्यदक्ष महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांची बदली

पोलिस दलात पुन्हा फेरबदल, अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्तपदी, शिवदीप लांडे यांना पदोन्नती

(Four IAS officers transferred in Mumbai and Thane different department)