आई 10 महिन्याच्या लेकराला घेऊन इकोत बसली, पण वाटेत नराधमांचं संतापजनक कृत्य, विरार हादरलं

| Updated on: Dec 11, 2022 | 12:10 AM

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार हद्दीत एका 21 वर्षीय विवाहित महिलेचा चालत्या प्रवासी इको कारमध्ये विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

आई 10 महिन्याच्या लेकराला घेऊन इकोत बसली, पण वाटेत नराधमांचं संतापजनक कृत्य, विरार हादरलं
Follow us on

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार हद्दीत एका 21 वर्षीय विवाहित महिलेचा चालत्या प्रवासी इको कारमध्ये विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आरोपींनी पीडितेच्या 10 महिन्याच्या मुलीला कारमधून बाहेर फेकून दिल्याचं संतापजनक कृत्य केलंय. या घटनेत 10 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झालाय. संबंधित घटना ही शनिवारी (10 डिसेंबर) सकाळी साडेअकारा वाजेच्या सुमारास विरार फाटा येथे घडली.

या घटनेत महिला ही जखमी झाली असून वसई विरार महापालिकेच्या तुलिंज रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेप्रकरणी कलम 302, 354 अंतर्गत गुन्हा दाखल करत असल्याची माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफ्फुल वाघ यांनी फोनवर दिलीय.

पीडित महिला ही आपल्या 10 महिन्याच्या मुलीला घेऊन, नालासोपारा पेल्हार फाटा येथून GJ 15, PJ 1137 या नंबरच्या इको कारमध्ये बसून आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. काही अंतरावर पुढे गेल्यानंतर कारमधील इतर नराधमांनी तिच्याशी असभ्य वर्तन करीत तिची छेड काढली.

हे सुद्धा वाचा

आरोपींनी पीडितेच्या 10 महिन्यांच्या बाळाला बाहेर फेकले. त्याला वाचवण्यासाठी महिलेनेही गाडीतून बाहेर उडी मारली. त्यात ती जखमी झाली तर तिच्या बाळाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय.

दरम्यान, महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी त्याच इको कारमध्ये पीडित महिला आणि मुलीला घेऊन तुलिंज येथील रुग्णालयात दाखल केले. पण मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

इको कार चालक विजय कुशवाह याला कारसह मांडवी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केलीय. तर श्रमजीवी संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी मांडवी पोलिसांनी या प्रकरणात दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

या सर्व प्रकरणात आम्ही पोलिसांना आपली अधिकृत बाजू विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.