मुंबई : अत्याधुनिक यंत्रणा आणि फ्रेंच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार झालेली स्कॉर्पिअन श्रेणीतील चौथी पाणबुडी अखेर समुद्रात झेपावण्यासाठी सज्ज झाली आहे. आयएनएस ‘वेला’ असे या पाणबुडीचे नाव आहे. मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) या सरकारी कंपनीने ही पाणबुडी तयार केली आहे. आज सोमवारी (6 मे) ला ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.
काही वर्षांपूर्वी स्कॉर्पिन श्रेणीतील सहा पाणबुड्या तयार करण्यासाठी भारताने फ्रान्समधील मेसर्स नेवल ग्रुप (डीसीएनएस) या कंपनीशी करार केला होता. या करारानुसार स्कॉर्पियन पद्धतीची आयएनएस कलवरी ही पाणबुडी 14 डिसेंबर 2017 मध्ये नौदलाच्या ताफ्यात सुपूर्द करण्यात आली होती. त्यानंतर आयएनएस खादेंरी आणि आयएनएस करंज या दोन पाणबुड्या भारतीय नौदलात दाखल झाल्या.
त्यानंतर आज सोमवारी स्कॉर्पिअन श्रेणीतील चौथी पाणबुडी भारतीय नौदलात दाखल झाली. सध्या या पाणबुडीच्या अनेक चाचण्या घेण्यात येणार आहे. या चाचण्यांमध्ये वेला पाणबुडीने योग्य ती क्षमता सिद्ध केल्यास तिचा नौदलात समावेश केला जाईल अशी माहिती नौदलातील अधिकाऱ्यांनी दिली.
Some more pics from the launch ceremony at M/s. MDL Mumbai pic.twitter.com/PT8vxaD81e
— SpokespersonNavy (@indiannavy) May 6, 2019
भारतीय लष्कर हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे लष्कर मानले जाते. त्याचबरोबर भारताच्या नौदलाचाही जगभरात दबदबा आहे. भारतीय नौदलात सध्या तीन पाणबुड्या आहेत. त्यानंतर वेला या पाणबुडीच्या सर्व चाचण्या झाल्यानंतर तिचाही नौदलात समावेश होईल. यानंतर भारताकडे चार पाणबुड्या होतील. यामुळे भारताची समुद्रातील ताकद कित्येक पटीने वाढणार आहे.
त्याशिवाय भारतीय नौदलात स्कॉर्पिअन पद्धतीच्या आणखी दोन अशा दर्जाच्या पाणबुड्या तयार करण्याचे काम सुरू आहे. आयएनएस वागिर व आयएनएस वागशीर अशी या दोन पाणबुड्यांची नावं आहेत. या पाणबुड्यांचे काम लवकरच पूर्ण होणार असून त्यांनाही नौदलात समाविष्ट केलं जाणार आहे.
‘वेला’ पाणबुडीची वैशिष्ट्य :