मुंबई : मंत्री नितीन राऊत यांचा नातेवाईक असल्याचं सांगून अनेकांना गंडा घालणाचा प्रकार समोर आलाय. संदीप राऊत (Sandeep Raut) नावाच्या व्यक्तीविरोधात दादर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. संदीप राऊत हा स्वतःला नितीन राऊत यांचा नातेवाईक असल्याचं सांगायचा. विद्युत विभागात सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्यानं त्यानं काही लोकांची फसवणूक (Fraud) केली आहे. संदीपविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आतापर्यंत 11 जणांकडून पैसे घेऊन संदीपनं पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पोलिसांनी संदीपविरोधात गुन्हा दाखल (Crime filed) केलाय.
संदीप स्वतःला मंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचं सांगायचा. राऊत आपले काका आहेत. तुम्हाला विद्युत विभागात नोकरी लावून देऊ, असं आमिष द्यायचा. संदीपनं आतापर्यंत सुमारे 11 जणांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. मुंबईतील दादर पोलिसांनी संदिपविरोधात गुन्हा दाखल केलाय. एएनआयनं यासंदर्भात बातमी दिली आहे.
Mumbai’s Dadar Police have registered a case against one Sandeep Raut for duping 11 people on the pretext of providing them govt jobs in the electricity department by posing as the nephew of Maharashtra Energy Minister Nitin Raut
— ANI (@ANI) May 6, 2022
संदीपनं आणखी कुणाकुणाला गंडा घातला. याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. त्याच्या बोलण्यात किती तत्थ्य आहे, याचाही तपास करणं पोलिसांसमोर आव्हान आहे. नितीन राऊत यासंदर्भात काय स्पष्टीकरण देतात तेही पाहावं लागेल. संदीपचा खरोखरच नितीन राऊत यांच्याशी काही संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
तक्रारकर्त्यांनी सांगितलं की, संदीप राऊत नाव असल्यानं त्याच्यावर विश्वास ठेवला. नितीन राऊत पुतण्या असल्याचं सांगितल्यानं विश्वास वाटला. त्याला काही रक्कम दिली. पण, काम काही होत नव्हते. कित्तेक दिवस संदीप टाळाटाळ करत होता. त्यामुळं संशय बळावला. शेवटी पोलिसांत तक्रार दाखल केली.