मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यभरात अडकलेले नागरिक, विद्यार्थी, पर्यटक आणि मजुरांसाठी लालपरी अर्थात एसटी मदतीला (Free ST Bus Service) धावली आहे. नियम आणि अटींसह एसटी महामंडळ या सर्व लोकांना इच्छित स्थळी मोफत पोहोचवणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली.
मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेल्या व्यक्ती अशा आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था प्रशासनाकडून (Free ST Bus Service) करण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता बाकी सर्व ठिकाणच्या प्रवाशांना एसटीने प्रवास करता येणार आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला मदत आणि पुनर्वसन विभागाकडून आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे संचारबंदीमुळे राज्यात अडकलेले नागरिक आपापल्या जिल्हयात जाऊ शकतील. यासाठी मोफत एसटी बस सेवा पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, या प्रवासासाठी प्रशासनाने काही नियम आणि अटी घातल्या आहेत.
पुणे विभागात 26 हजार 509 स्थलांतरित मजूरांची सोयhttps://t.co/R5I0ceQa20#Pune #CoronaUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2020
काय आहेत एसटी प्रवासाचे नियम?
VIDEO :
संबंधित बातम्या :
अख्खा एसटी डेपो दवाखान्यात बदलला, भोर डेपोत मोफत फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु
विद्यार्थी, मजूर ते नातेवाईकांकडे अडकलेले पाहुणे, जिल्ह्यात परतण्यासाठी एसटीची मोफत सेवा