मुंबई: लहान मुलांचं लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेने प्लान तयार केला आहे. केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर लगेच दोन ते तीन दिवसात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल, असं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं.
सुरेश काकाणी यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबईचा प्लान तयार आहे. मुंबईत 30 लाख लहान मुलांचं लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडून सविस्तर गाईडलाईन येताच 2-3 दिवसांत लहान मुलांचे लसrकरण सुरु करण्यात येईल. प्रसूतीगृह आणि लहान मुलांची रुग्णालये, महापालिकेची 350 लसीकरण केंद्रे या ठिकाणी लहान मुलांचे लसीकरण होईल, असं काकाणी यांनी सांगितलं.
लस देण्यासाठीची सीरींज, निडल कदाचित वेगळी असेल. निडलची साईज काय असेल याबाबत स्पष्टता नाही. याबाबत केंद्र सरकारकडून सविस्तर गाईडलाईन येणं गरजेचं आहे. पुरेसा लससाठा करण्यासाठी शीतगृह आहेतच. मात्र, लहान मुलांसाठीच्या लसीकरता वेगळ्या तापमानाची आवश्यकता असेल का याबाबतही गाईडलाईननंतर स्पष्टता येईल.1500 व्यक्तींच्या स्टाफला लहान मुलांच्या लसीकरणासाठी ट्रेनिंग देण्यात येईल. खासगी रुग्णालयांतील डॉक्टर्सनाही ट्रेनिंग देण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
लहान मुलांच्या लसीकरणानंतर काही रिअॅक्शन्स आल्या तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिअॅट्रीक वॉर्ड उभारण्यात आले आहेत. त्याचा वापर करता येऊ शकेल. लहान मुलांच्या लसीकरणा करताही महापालिका जनजागृती मोहीम हातात घेईल. प्रायोगिक तत्त्वावर ज्या लहान मुलांना आतापर्यंत लसी देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कोणतेही गंभीर रिअॅक्शन आढळलेल्या नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 1 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात देशात 15 हजार 823 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 226 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या सव्वा दोन लाखांच्या आत आहे. गेल्या 24 तासात भारतात 15 हजार 823 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 226 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 22 हजार 844 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 14 October 2021 https://t.co/AivafddpNC #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2021
संबंधित बातम्या:
(Fully prepared to vaccinate children after government guideline, says BMC)