1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेम याला जीवाची भीती सतावत आहे. तळोजा कारागृहातून इतर कारागृहात स्थलांतर करण्याच्या बहाण्याने आपले एनकाऊंटर होऊ शकते अशी भीती त्याने व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर त्याने असे स्थलांतर करण्यास परवानगी नाकारण्याची न्यायालयाकडे याचिकेद्वारे विनंती केली आहे. सुनावणीअंती अबू सालेमचे पुढील निर्देशांपर्यंत तळोजा कारागृहातून स्थलांतर करु नये, असे निर्देश विशेष न्यायालयाने तळोजा कारागृह प्रशासनाला दिले आहेत
पोर्तुगालमधून आणले भारतात
सालेम अंडा सेलमध्ये
1993 मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असलेल्या अबू सालेमचे पोर्तुगाल येथून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. ऑर्थररोड कारागृहात डोसाच्या सहकाऱ्याने हल्ला केल्यावर त्याला ठाणे कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र नंतर पुन्हा तळोजा कारागृहात ठेवण्यात आले. सध्या त्याचे वास्तव्य तळोजा कारागृहातील अंडा सेल मध्ये आहे. मात्र आता तळोजा कारागृह प्रशासनाने अंडा सेलच्या दुरुस्तीच्या कारणासाठी अबू सालेम ला दुसऱ्या कारागृहात नेण्याचा निर्णय घेतला आहे. तळोजा कारागृह प्रशासनाच्या या निर्णयामुळे अबू सालेम धास्तावला आहे.